Plastic bottles of water are not banned; Plastic restriction that is not reusable | Plastic Ban : पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी नाहीच; पुनर्वापर अशक्य असलेल्या प्लॅस्टिकलाच प्रतिबंध
Plastic Ban : पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी नाहीच; पुनर्वापर अशक्य असलेल्या प्लॅस्टिकलाच प्रतिबंध

संतोष ठाकूर

नवी दिल्ली : येत्या २ ऑक्टोबरपासून प्लॅस्टिकमुक्तीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली, तरी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना त्यातून वगळण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार नाही.
ते म्हणाले की, सध्या आम्ही केवळ एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकबाबत विचार करीत आहोत.
ज्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करता येत नाही, अशा प्लॅस्टिकमुक्तीबाबत पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखविले होते.
कित्येक वेळा २00 मिली प्लॅस्टिक बाटल्यांचा पाण्यासाठी वापर होतो, पण त्या पुन्हा वापरल्या जात नाहीत. त्यामुळे लहान आकाराच्या या बाटल्यांवर बंदी घालावी का, याचा विचार सुरू आहे. मात्र, यावर अभ्यास सुरू असून, त्याबाबतचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. तूर्त तरी ज्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करता येत नाही, त्यावरच बंदीच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे.

English summary :
Plastic ban has been announced by Prime Minister Narendra Modi from October 7, 2019 but Union Minister Prakash Javadekar said that the sale of bottles made from plastic will not be banned.


Web Title: Plastic bottles of water are not banned; Plastic restriction that is not reusable
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.