Fact Check : प्रवाशांनो लक्ष द्या...! 1 डिसेंबरपासून बंद होणार सर्व ट्रेन? रेल्वे मंत्रालयानं दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 04:50 PM2020-11-24T16:50:38+5:302020-11-24T16:51:21+5:30

आपल्याकडेही अशा प्रकारचा एखादा मेसेज आला असेल, तर...

PIB fact check covid-19 special trains stop operating after 1st December | Fact Check : प्रवाशांनो लक्ष द्या...! 1 डिसेंबरपासून बंद होणार सर्व ट्रेन? रेल्वे मंत्रालयानं दिलं असं उत्तर

Fact Check : प्रवाशांनो लक्ष द्या...! 1 डिसेंबरपासून बंद होणार सर्व ट्रेन? रेल्वे मंत्रालयानं दिलं असं उत्तर

Next

नवी दिल्ली - आपण 1 डिसेंबरनंतर कुठे जाण्याचा विचार करत आहात? रेल्वेचे रिझर्व्हेशन केले आहे? जर असे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या WhatsAppवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 1 डिसेंबरपासून रेल्वे, कोविड-19 विशेष रेल्वेगाड्यांसह सर्वच रेल्वे गाड्या बंद करणार असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र, आपल्याकडेही अशा प्रकारचा एखादा मेसेज आला असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची आश्यकता नाही. कारण हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे समोर आले आहे.

खुद्द भारत सरकारची संस्था पीआयबीने या व्हायरल मैसेजच्या सत्यतेची पडताळणी करत खुलासा केला आहे. तर जाणून घेऊयात या मेसेज मागची सत्यता...

संबंधित मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे, की रेल्वे, कोविड-19 विशेष रेल्वे गाड्यांसह सर्व रेल्वे गाड्या 1 डिसेंबरनंतर बंद करणार आहे. मात्र, "सध्या सरकारचा असा कुठलाही विचार नाही. तसेच हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. PIBFactCheckने दावा केला आहे, की 1 डिसेंबरनंतर रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. रेल्वेनेही यासंदर्भात माहिती दिली आहे.

आपल्यालाही अशा प्रकारच्या एखाद्या मेसेजवर शंका आली, तर आपणही तो मेसेज पीआयबी फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ अथवा व्हाट्सअॅप क्रमांक +918799711259 अथवा ईमेल - pibfactcheck@gmail.comवर पाठवू शकता. ही माहिती पीआयबीची वेबसाईट https://pib.gov.in वरही उपलब्ध आहे.

कोरोना काळात देशात अनेक प्रकारचे फेक मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्युरोने अनेक व्हायरल मेसेजची पडताळणी करत त्याची सत्यता सर्वांसमोर आणली आहे. अशा पद्धतीचे खोटे मेसेज पसरू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
 

Web Title: PIB fact check covid-19 special trains stop operating after 1st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.