Petrol price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाले; आज किंमतीत कोणताही बदल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 09:58 AM2020-03-11T09:58:55+5:302020-03-11T15:33:36+5:30

बुधवारी पेट्रोल, डिझेलची किंमत स्थिर ठेवण्यात येते. Petrol prices, Diesel prices.

Petrol gets cheaper by 5 rupees this year; no change in price today hrb | Petrol price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाले; आज किंमतीत कोणताही बदल नाही

Petrol price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाले; आज किंमतीत कोणताही बदल नाही

Next
ठळक मुद्देमार्च महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत पेट्रोलची किंमत 1 रुपये 60 पैशांनी कमी झाल्या आहेत.मंगळवारी तेलाच्या किंमतीत थोडी वाढ झाली आहे. ओपेकने कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या मागणीसाठी उत्पादन कमी करण्याची विनंती केली होती.

नवी दिल्ली : आधी कोरोना आणि नंतर सौदी अरेबियाने छेडलेले तेलाच्या किंमतींचे युद्ध, यामुळे तेलाच्या किंमती कमालीच्या कमी झाल्या आहेत. सोमवारी सौदीने अचानक तेलाच्या किंमती 30 टक्क्यांनी कमी केल्याने देशोदेशीचे शेअरबाजारही गडगडले होते. मात्र, मंगळवारी तेलाच्या किंमतीत थोडी वाढ झाली आहे. असे असले तरी भारतात मात्र आज तेलाच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दर बुधवारी पेट्रोल, डिझेलचे दर बदलण्यात येत नाहीत. 


मार्च महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत पेट्रोलची किंमत 1 रुपये 60 पैशांनी कमी झाल्या आहेत. तर डिझेलची किंमत 1.50 रुपयांनी कमी झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत. पेट्रोल 75.99 आणि डिझेल 65.97 रुपयांना मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत पेट्रोलच्या किंमतीमध्ये 54 पैशांची कपात झाली आहे. 

हे दर गेल्या आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहेत. 2020 मध्ये गेल्या सव्वादोन महिन्यांत पेट्रोल 5 रुपयांनी कमी झाले आहे. 27 फेब्रुवारीपासून ही घट सुरू आहे. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 30 टकक्यांनी कमी झालेले असले तरीही भारतात हे दर एवढ्यात कमी होण्याची शक्यता नाही. कारण पेट्रोल डिझेलचे दर दररोज ठरविताना एक नियम केलेला आहे. यामध्ये ऑईल कंपन्या 15 दिवसांचा बेंचमार्क रेटचा ताळमेळ ठेवत दर ठरवतात. यामुळे हे दर कच्चे तेल आणि डॉलरची किंमत यावरील चढ-उतारावर अवलंबून असते. 

Petrol prices: ५० रुपये लिटरने मिळू शकतं पेट्रोल; चकित झालात?, मग कसं ते वाचाच!


ओपेकने कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या मागणीसाठी उत्पादन कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, रशियाने यास नकार दिला. यामुळे सौदीने झटक्यात तेलाच्या किंमती कमी केल्या, यामुळे सोमवारी कच्चे तेल 31 टक्क्यांनी घसरले. मात्र मंगळवारी तेलाची किमत जवळपास 8 टक्क्यांनी वाढली. 

Web Title: Petrol gets cheaper by 5 rupees this year; no change in price today hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.