Petrol Diesel Price: आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:35 AM2021-10-22T08:35:03+5:302021-10-22T08:35:11+5:30

Petrol Diesel Price: आज पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे.

Petrol Diesel Price Hike Today 22 October 2021, Find out New Rate of Fuel | Petrol Diesel Price: आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price: आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Next

नवी दिल्ली:पेट्रोल-डिझेलच्या(Petrol Diesel Price) किंमती दररोज नवनवे विक्रम करत आहेत. आजही सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. 

पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.89 आणि 95.62 रुपये इतका आहे. तर, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.78 रुपये इतका आहे. तर एका लिटर डिझेलसाठी 103.63 रुपये मोजावे लागत आहेत. 

ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांनी वाढ
आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 15 पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत पेट्रोल 5.15 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत.

दररोज सकाळी किंमती बदलतात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात, नवे दर सकाळी 6 पासून लागू केले जातात. अनेकवेळा दुसऱ्या दिवशीही सारखाच राहतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

सरकार इंधनावर कर लावते

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेल्या उसळीने 28 सप्टेंबरला पेट्रोल आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवर लागलेला ब्रेक संपवला. तेव्हापासून पेट्रोलच्या किंमतीत 18 पट आणि डिझेलच्या किंमतीत 21 पट वाढ झाली आहे. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्कावर आधारित इंधनाचे दर राज्यानुसार बदलतात. याशिवाय, केंद्र सरकार इंधनावर उत्पादन शुल्क लावते. आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या 15 दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

असे तपासा पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही एसएमएसद्वारे तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागेल. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकतात.

Web Title: Petrol Diesel Price Hike Today 22 October 2021, Find out New Rate of Fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.