पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:01 AM2021-05-06T02:01:36+5:302021-05-06T02:02:00+5:30

या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९०.७४ रुपये लिटर आणि डिझेल ८१.१२ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल ९७.१२ रुपये लिटर, तर डिझेल ८८.१९ रुपये लिटर झाले

Petrol-diesel price hike again on Wednesday | पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ

Next

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर १९ पैशांनी, तर डिझेलचे दर २१ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.

या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९०.७४ रुपये लिटर आणि डिझेल ८१.१२ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल ९७.१२ रुपये लिटर, तर डिझेल ८८.१९ रुपये लिटर झाले.  ही दरवाढ देशभरात लागू झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ रोखून धरली      होती. 
 

Web Title: Petrol-diesel price hike again on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.