"लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती ही…."; उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेस नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 02:24 PM2021-12-05T14:24:19+5:302021-12-05T14:27:44+5:30

Rashid Alvi And BJP : उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

People wearing Lungi not criminals, says Rashid Alvi on UP Dy CM's 'Lungi Chhaap goons' comment | "लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती ही…."; उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेस नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर 

"लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती ही…."; उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेस नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर 

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी एक विधान केलं आहे. व्यापाऱ्यांसाठी एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे. योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत असं म्हटलं आहे. तसेच भाजपाची सत्ता येण्यापूर्वी लुंगीवाले गुंड राज्यात मुक्तपणे फिरत होते आणि जाळीदार टोपी घातलेले लोक व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानावर आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

काँग्रेस नेते राशीद अल्वी (Rashid Alvi) यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी विशिष्ट समुदायाला भाजपा लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "उत्तर प्रदेशातील निम्मी हिंदू लोकसंख्या लुंगी घालते. त्यामुळे मौर्य यांच्या विधानाचा अर्थ लुंगी परिधान करणारे गुन्हेगार आहेत का?" असा सवाल अल्वी यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर अल्वी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. तसेच भाजपाची निवडणूक जिंकण्याची हुशारी जनतेला समजली असून त्यामुळे भाजपा घाबरल्याचंही अल्वी म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांची केली सुटका"

प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेला केशव प्रसाद मौर्य यांनी संबोधित केले. "2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीछाप गुंड फिरत होते. डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्‍यांना धमकावण्याकरिता वापरत असत. जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमके द्यायचे. मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. अन्यथा, सपा आणि बसपाच्या राजवटीत टोप्या आणि लुंगी घातलेले गुंड व्यापाऱ्यांना धमकावायचे आणि खंडणी वसूल करायचे. आज हे सर्व नाहीसे झाले आहे, कारण भाजपाने टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत संपवली आहे."

"2022 मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल"

"व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने 2014 ते 2019 पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत" असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या निवडणुकीसाठी सपा, बसपा आणि भाजपा जोरदार प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपा पूर्ण आत्मविश्वासात आहे. यावेळी निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकून 2022 मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल असा भाजपाचा दावा आहे. भाजपाने प्रयागराजमध्ये मंडलस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, फतेहपूर येथील व्यापारी सहभागी झाले होते. 

Web Title: People wearing Lungi not criminals, says Rashid Alvi on UP Dy CM's 'Lungi Chhaap goons' comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.