शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
2
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
3
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
4
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
5
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
6
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
7
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
8
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
9
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
10
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
11
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
12
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
13
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
14
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
15
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
16
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
17
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
18
"बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन…" IPL वर वसीम अक्रमची तिखट टिप्पणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
19
‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
20
प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक
Daily Top 2Weekly Top 5

RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:44 IST

Parliament Winter Session: राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्र-हरियाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला.

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशात वंदे मातरम् गीतावरील चर्चेदरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा व्होट चोरीचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय, त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता, सरकारी संस्थांवरील नियंत्रण आणि RSSच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. 

RSS सर्व संस्थांवर कब्जा करू इच्छिते

राहुल गांधी म्हणाले की, मी सरकारी संस्थांवरील RSS च्या ताब्याबद्दल बोलतोय. RSS ला समानतेच्या भावनेची अॅलर्जी आहे. राहुल गांधी यांनी दावा केला की, निवडणूक आयोग आता स्वतंत्र संस्था न राहता RSSच्या प्रभावाखाली कार्यरत आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर RSSचा कब्जा असल्याचा दावा केला. मी गडबडीचे पुरावे दिले, पण आयोगाने काहीच कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले, RSS सर्व राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करू पाहते. निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून CJI ला काढले, कारण हे आयोगावर कब्जा करू इच्छितात. हे संपूर्ण आयोगावर नियंत्रण मिळवू इच्छितात. डिसेंबर 2023 मध्ये सरकारने कायदा बदलून निवडणूक आयुक्तांना इम्युनिटी दिली. सरकार निवडणूक सुधारणा करू इच्छित नाही. बिहारमध्ये SIR झाल्यानंतरही डुप्लिकेट मतदार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मतचोरी हा सर्वात मोठा देशद्रोहसर्वात मोठे देशद्रोही कृत्य म्हणजे मतचोरी. तुम्ही मतचोरी करता, म्हणजे भारताची कल्पनाच नष्ट करता. जे समोर बसले आहेत, ते ‘वोट चोरी’ करून राष्ट्रविरोधी काम करत आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणूक चोरली गेली. बिहारमध्ये SIRनंतर 1.2 लाख डुप्लिकेट फोटो आढळले. डुप्लिकेट मतदारांबद्दल आयोग शांत आहे. हरियाणाच्या मतदार यादीत एका ब्राझिलियन महिलेचा फोटो 22 वेळा होता. आमच्याकडे मतचोरीचे पुरावे आहेत, पण मी ते इथे दाखवणार नाही. भाजप लोकशाहीला नुकसान पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मतदार यादी निवडणुकीच्या एका महिन्यापूर्वी सर्व पक्षांना द्यावी. CCTV नष्ट करण्याचा नियम असलेला कायदाच रद्द केला पाहिजे. निवडणूक आयुक्तांना दिलेली इम्युनिटीदेखील तात्काळ काढून टाकली पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Accuses RSS of Capturing Indian Institutions in Parliament

Web Summary : Rahul Gandhi alleged RSS controls institutions, including the Election Commission. He criticized electoral irregularities, demanding transparency and reforms. Gandhi claimed evidence of vote theft in Maharashtra and Haryana exists, accusing BJP of undermining democracy through the Election Commission.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग