RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:44 IST2025-12-09T17:43:16+5:302025-12-09T17:44:05+5:30
Parliament Winter Session: राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्र-हरियाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला.

RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशात वंदे मातरम् गीतावरील चर्चेदरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा व्होट चोरीचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय, त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता, सरकारी संस्थांवरील नियंत्रण आणि RSSच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
RSS सर्व संस्थांवर कब्जा करू इच्छिते
राहुल गांधी म्हणाले की, मी सरकारी संस्थांवरील RSS च्या ताब्याबद्दल बोलतोय. RSS ला समानतेच्या भावनेची अॅलर्जी आहे. राहुल गांधी यांनी दावा केला की, निवडणूक आयोग आता स्वतंत्र संस्था न राहता RSSच्या प्रभावाखाली कार्यरत आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर RSSचा कब्जा असल्याचा दावा केला. मी गडबडीचे पुरावे दिले, पण आयोगाने काहीच कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले, RSS सर्व राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करू पाहते. निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून CJI ला काढले, कारण हे आयोगावर कब्जा करू इच्छितात. हे संपूर्ण आयोगावर नियंत्रण मिळवू इच्छितात. डिसेंबर 2023 मध्ये सरकारने कायदा बदलून निवडणूक आयुक्तांना इम्युनिटी दिली. सरकार निवडणूक सुधारणा करू इच्छित नाही. बिहारमध्ये SIR झाल्यानंतरही डुप्लिकेट मतदार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
LIVE: LoP Shri @RahulGandhi speaks in Parliament | Discussion on Electoral Reforms https://t.co/xQcIsZmZl5
— Congress (@INCIndia) December 9, 2025
मतचोरी हा सर्वात मोठा देशद्रोह
सर्वात मोठे देशद्रोही कृत्य म्हणजे मतचोरी. तुम्ही मतचोरी करता, म्हणजे भारताची कल्पनाच नष्ट करता. जे समोर बसले आहेत, ते ‘वोट चोरी’ करून राष्ट्रविरोधी काम करत आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणूक चोरली गेली. बिहारमध्ये SIRनंतर 1.2 लाख डुप्लिकेट फोटो आढळले. डुप्लिकेट मतदारांबद्दल आयोग शांत आहे. हरियाणाच्या मतदार यादीत एका ब्राझिलियन महिलेचा फोटो 22 वेळा होता. आमच्याकडे मतचोरीचे पुरावे आहेत, पण मी ते इथे दाखवणार नाही. भाजप लोकशाहीला नुकसान पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मतदार यादी निवडणुकीच्या एका महिन्यापूर्वी सर्व पक्षांना द्यावी. CCTV नष्ट करण्याचा नियम असलेला कायदाच रद्द केला पाहिजे. निवडणूक आयुक्तांना दिलेली इम्युनिटीदेखील तात्काळ काढून टाकली पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली.