ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 10:34 AM2021-01-14T10:34:55+5:302021-01-14T10:47:41+5:30

Panchayat Election News : अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

panchayat election 102 votes made on same house and address mukesh agnihotri raised questions | ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ

ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ

Next

नवी दिल्ली - निवडणूक जवळ आल्यानंतर बऱ्याचदा अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ झालेला पाहायला मिळतो. अनेकांची नावं ही यादीतून गायब असतात. तर काही ठिकाणी जास्त मतदारांच्या नावाची नोंद असते. अशीच काहीशी अजब घटना आता हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्येही असाच एक घोळ समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करत मतदार यादीच्या विश्वासार्हतेसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. 

आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच काही फोटो शेअर करून निवडणुकींमध्ये काहीतरी घोळ असल्याचा आरोप देखील केला आहे. अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. 

टाहलीवाल में एक ही मकान एवं पते पर बना दी  102 वोटे,जिनमे अधिकांश प्रवासी। यूँ किया वोटों का गोरखधंधा।

Posted by Mukesh Agnihotri on Tuesday, January 12, 2021

टाहलीवाल निवडणुकीत झालेल्या घोळामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र दाखवत असल्याने मतदारयादीच्या विश्वासर्हतेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप देखील मुकेश अग्निहोत्री यांनी केला आहे. मात्र या धक्कादायक प्रकाराबाबत प्रशासनाला अद्याप कोणतीही माहिती नाही. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. 

हरोलीचे उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या गौरव चौधरी यांनी आपल्याला या गोंधळासंदर्भात काहीच कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. कोणी तक्रार केल्यास यासंदर्भात कारवाई केली जाईल असंही चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा मतदारसंघ असलेल्या हरोलीमधील एकमेव नगरपंचायत टाहलीवालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजप समर्थित असलेल्या नगरसेवकांना बहुमत मिळाले, तर काँग्रेस समर्थित उमेदवारांना कमी जागांवर समाधान मानावे लागले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Web Title: panchayat election 102 votes made on same house and address mukesh agnihotri raised questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.