'पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, लाहोरमध्ये हिंदी दिवस साजरा करू'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 07:37 PM2019-09-13T19:37:55+5:302019-09-13T19:39:16+5:30

सन 1947 पूर्वी पाकिस्तान जगाच्या नकाशावर नव्हता, आता पुन्हा एकदा पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही.

'Pakistan will disappear from world map, celebrate Hindi day in Lahore', RSS leader indresh kumar | 'पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, लाहोरमध्ये हिंदी दिवस साजरा करू'

'पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, लाहोरमध्ये हिंदी दिवस साजरा करू'

Next
ठळक मुद्देसन 1947 पूर्वी पाकिस्तान जगाच्या नकाशावर नव्हता, आता पुन्हा एकदा पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि पदाधिकारी नेहमीच आपल्या भडकाऊ आणि स्फोटक विधानांमुळे प्रकाशझोतात येतात. आता, आरएसएसचे प्रचारक इंद्रेश कुमार यांनी पाकिस्तानबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन कायमचा नष्ट होईल, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटलंय. फुटीरतावादी आंदोलनामुळे पाकिस्तान नेस्तनाबूत होऊन पुढील काही दिवसांत भारत देश लाहोरमध्ये महात्मा गांधींची जयंती साजरी करेल, असेही कुमार यांनी सांगितले.  

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आज मुजफ्फराबाद येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाचं नेतृत्व करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान आणि इम्रान खान अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच, गेल्या महिनाभरातील इम्रान खान यांचा हा मुजफ्फरमधील दुसरा दौरा आहे. 

सन 1947 पूर्वी पाकिस्तान जगाच्या नकाशावर नव्हता, आता पुन्हा एकदा पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही. त्यामुळेच, आपण लाहोरमध्ये गांधी जयंती आणि हिंदी दिवस साजरा करू, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे. एनडीएमसी कन्वेंशन सेंटर येथील कार्यक्रमात बोलताना कुमार यांनी पाकिस्तानावर हल्लाबोल केला. आज पाकिस्तानचे 5 ते 6 तुकड्यांमध्ये विभाजन होण्याची अवस्था झालीय. पश्तूनिस्तान, बलूचिस्तान, सिंध हे पाकिस्‍तानपासून वेगळं होऊ इच्छित आहेत. 


 

Web Title: 'Pakistan will disappear from world map, celebrate Hindi day in Lahore', RSS leader indresh kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.