PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 01:26 PM2021-05-13T13:26:07+5:302021-05-13T13:50:59+5:30

ventilators : डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हे व्हेंटिलेटर्स एक किंवा दोन तासांच्या वापरानंतर आपोआप बंद होतात.

out of 80 ventilators sent by the pm cares fund to punjab 62 were defected | PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू

PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू

Next
ठळक मुद्देप्राधान्याने तत्काळ रुग्णालयात दहा नवीन व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

चंदीगड :  पीएम केअर्स फंडद्वारे (PM Cares Fund) पंजाबला पाठविलेल्या व्हेंटिलेटर्सवरून (Ventilators) केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. केंद्र सरकारने पंजाबला दिलेल्या ८०९ व्हेंटिलेटर्सच्या वापरण्याबाबत विचारणा करणारे एक पत्र लिहिले होते. त्यावर आता फरीदकोटमधील गुरु गोविंदसिंग मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे (Guru Gobind Singh Medical College and Hospital)व्यवस्थापक म्हणाले की, पीएम केअर्स फंडद्वारे पाठविण्यात आलेले ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ व्हेंटिलेटर्स खराब आहेत. दरम्यान, हे व्हेंटिलेटर पीएम केअर्स फंड अंतर्गत एजीव्हीए हेल्थकेअरने (AgVa Healthcare) गुरु गोविंदसिंग मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलला दिले होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हे व्हेंटिलेटर्स एक किंवा दोन तासांच्या वापरानंतर आपोआप बंद होतात.

सध्या रुग्णालयातील ४२ व्हेंटिलेटर्स योग्य स्थितीत आहेत. पीएम केअर्स फंडद्वारे आलेले ६२ व्हेंटिलेटर खराब आहेत. याबद्दल कंपनीशी चर्चा झाली आहे. कंपनीने लवकरच तांत्रिक कर्मचारी पाठवून व्हेंटिलेटर्स ठिक करण्याचे आश्वासन दिले आहे, असे बाबा फरीद विद्यापीठाचे (Baba Farid University)कुलगुरू डॉ. राजा बहादुर यांनी सांगितले. तसेच, पंजाब सरकारने १० नवीन व्हेंटिलेटर खरेदी करण्यास परवानगी दिली आहे, असेही डॉ. राजा बहादुर म्हणाले.

(Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...)

एका रिपोर्टनुसार, पंजाबमध्ये पीएम केअर्स फंडमधून पाठविण्यात येणाऱ्या ८०९ व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी पंजाब सरकारवर व्हेंटिलेटर बसविण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्य सचिव विनी महाजन (Chief Secretary Vini Mahajan) यांनी खराब व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्यासाठी अभियंते व तंत्रज्ञ नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे. याचबरोबर, प्राधान्याने तत्काळ रुग्णालयात दहा नवीन व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

("कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत", 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी)

दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता व्हेंटिलेटर्स खराब असल्याचे समोर आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

व्हेंटिलेटर्स सदोष असल्याच्या दाव्यावर मोदी सरकारकडून खुलासा
पंजाबमधील फरीदकोट येथे केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडमधून मदत म्हणून पाठवलेले व्हेंटिलेटर्स सदोष असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र आता यासंदर्भात केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्र सरकारने पीएम केअर्सअंतर्गत पुरवलेले काही व्हेंटिलेटर्स फरीदकोटमधील जीजीएस मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पडून असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या व्हेंटिलेटर्समध्ये तांत्रिक अडचणी असून निर्मात्या कंपनीने वस्तू खरेदी करण्यात आल्यानंतर देण्यात येणारी सेवा नीट दिली नसल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे. मात्र या बातम्यांमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (बीईएल) ८८ व्हेंटिलेटर्स पुरवले आहेत. तसेच पाच व्हेंटिलेटर्स एजीव्हीएने पुरवले आहेत. या व्हेटिलेटर्सचे इन्टॉलेशन आणि कमिशनिंग झाल्यानंतर हे व्हेंलिटेर्स आम्ही स्वीकारत आहोत असे पत्र रुग्णालय प्रशासनाने दिले होते, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

Web Title: out of 80 ventilators sent by the pm cares fund to punjab 62 were defected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.