Government Jobs: मोठ्या सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी; चार ठिकाणी नोकरीचे पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 05:07 PM2020-12-28T17:07:54+5:302020-12-28T17:16:03+5:30

Government Jobs in banking sector : एकीकडे स्पर्धा वाढत असताना आता सरकारी नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. त्यापेक्षाही जास्त कठीण म्हणजे तिथे भरती आहे हे वेळेवर समजणे. वेळेत जर हे समजले तर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

Opportunity to work in large government banks; LIC, SBI like Job options | Government Jobs: मोठ्या सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी; चार ठिकाणी नोकरीचे पर्याय

Government Jobs: मोठ्या सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी; चार ठिकाणी नोकरीचे पर्याय

googlenewsNext

एकीकडे स्पर्धा वाढत असताना आता सरकारी नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. त्यापेक्षाही जास्त कठीण म्हणजे तिथे भरती आहे हे वेळेवर समजणे. सध्या एलआयसी, आयडीबीआय, एसबीआय आणि बँक ऑफ बडोदामध्ये जागा सुटलेल्या आहेत. एलआयसीसाठी अर्ज भरायला तर फक्त तीन दिवस उरले आहेत. वेळेत जर हे समजले तर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. नाहीतर मित्र, शेजारच्याची कधी निवड झाली आणि तो कधी नोकरीला लागला, हे सांगण्यातच आयुष्य जाण्याची वेळ येणार आहे. अशी वेळ येऊ द्यायची नाहीय ना....


SBI SO Recruitment 2020, Sarkari Naukri Job 2020: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यानुसार स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त असलेल्या 452 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ११ जानेवारीपर्यंत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. 
मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी 21 ते 35 वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 28 ते 30 वर्षे आहे. इंजिनिअर पदांसाठी 40 वर्षे आहे. यासाठी 23 हजार ते 51 हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे. 


अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

IDBI Bank Recruitment 2020: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे. पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 


अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा... 

LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीपासून  असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल  तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे. 


अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा... 

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी  २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट अधिकारी (Recruitment of Specialist Officers) च्या एकूण 32 जागा भरायच्या आहेत. यामध्ये २७ पदे सिक्युरिटी ऑफिसर तर ५ पदे फायर ऑफिसर (Fire Officers) ची आहेत. 


एलआयसी, BECIL एम्स नंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा... 

 

Web Title: Opportunity to work in large government banks; LIC, SBI like Job options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.