तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:17 PM2020-01-08T18:17:11+5:302020-01-08T18:34:51+5:30

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. मध्य पूर्वेमध्ये जवळपास 10 लाख भारतीय नोकरीसाठी वास्तव्यास आहेत.

One million Indians in crisis of America-Iran; The world at the threshold of World War III? | तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

Next
ठळक मुद्देअमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. यापुढे पाहिल्यास जवळपास 10 लाख भारतीयांचे प्राण धोक्यात आले आहेत. तीन दशकांपूर्वी जेव्हा इराकने कुवैतवर हल्ला केला होता, तेव्हा तेथील काही भारतीयांच्या मदतीने सरकारने मोठे रेस्क्यू ऑपरेशन चालविले होते.

नवी दिल्ली - अमेरिका आणि इराणमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटोने त्यांच्या कर्मचाऱ्यांना इराकमधून सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली आहे. इराणमध्ये आज यक्रेनच्या विमानाची दुर्घटना झाली असून अमेरिकेच्या तळांवर इराणकडून हल्ले चढविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश्य स्थिती असून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचेही बोलले जात आहे. 


अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण असून जर या दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाले तर याचा सर्वात मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मात्र, यापुढे पाहिल्यास जवळपास 10 लाख भारतीयांचे प्राण धोक्यात आले आहेत. 

मध्य पूर्वेमध्ये जवळपास 10 लाख भारतीय नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. तीन दशकांपूर्वी जेव्हा इराकने कुवैतवर हल्ला केला होता, तेव्हा तेथील काही भारतीयांच्या मदतीने सरकारने मोठे रेस्क्यू ऑपरेशन चालविले होते. यावेळी एअर इंडियाच्या विमानांनी सलग 58 दिवस नॉनस्टॉप 488 उड्डाणे करत 1.7 लाख लोकांना बाहेर काढले होते. हे जगातील आजपर्यंतचे दुसरे सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरले होते. आज जर अमेरिका आणि इराणमध्ये जर युद्ध झाले तर अन्य मुस्लिम देशही इराणला मदत करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अमेरिकेच्या फौजा आखाती देशांवर हल्ला करण्यास गय करणार नाहीत. 

अमेरिकेच्या तळांवर डागली 22 क्षेपणास्रे, 80 सैनिकांचा मृत्यू, इराणचा दावा 

सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

या देशांमध्ये तब्बल 10 लाखांवर भारतीय नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना भारतात आणण्यासाठी एअर इंडियालाच नाही तर अन्य विमान कंपन्यांनाही अहोरात्र काम करावे लागेल. दीड लाख लोकांना बाहेर काढण्यासाठी जर 58 दिवस लागले असतील तर 10 लाख लोकांना बाहेर काढण्यासाठी किती वेळ आणि किती संकटांना तोंड द्यावे लागेल याचाही विचार करणेही आवाक्याबाहेरचे आहे. महत्वाचे म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणणे हेच जिकीरीचे ठरणार आहे. कारण युद्धकाळात काळ, वेळ पाहिला जात नाही. या लोकांना बाहेर काढण्यासाठी भारताला एवढा वेळ मिळणेही शक्य नाही. कुवैतमध्ये हे शक्य झाले होते कारण तेव्हा भारताला तेवढा वेळ मिळाला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत.

युक्रेनचं विमान इराणमध्ये कोसळलं; 180 जणांचा मृत्यू

1988 मध्ये अमेरिकेने इराणचे प्रवासी विमान पाडले होते. यामध्ये 10 भारतीयांसोबत 288 जण ठार झाले होते. आजही असेच एक विमान पाडण्यात आले आहे. तेव्हा अमेरिकेने माफीही मागितली नव्हती. 
 

Web Title: One million Indians in crisis of America-Iran; The world at the threshold of World War III?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.