राष्ट्रपतींच्या भाषणात जुन्याच घोषणा; आर्थिक मंदी दूर करण्याबाबत एक शब्दही नाही, बेरोजगारीचे काय? काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 06:05 AM2020-02-01T06:05:57+5:302020-02-01T06:25:37+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात त्याच त्या जुन्या घोषणा होत्या, अशा शब्दात चिदम्बरम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Old announcement in President's speech; There is not one word about ending the economic downturn, what about unemployment? Congress criticism | राष्ट्रपतींच्या भाषणात जुन्याच घोषणा; आर्थिक मंदी दूर करण्याबाबत एक शब्दही नाही, बेरोजगारीचे काय? काँग्रेसची टीका

राष्ट्रपतींच्या भाषणात जुन्याच घोषणा; आर्थिक मंदी दूर करण्याबाबत एक शब्दही नाही, बेरोजगारीचे काय? काँग्रेसची टीका

Next

नवी दिल्ली : आर्थिक मंदी, नोकरी जाणे, बेरोजगारी वाढणे, वाढती महागाई आणि उद्योग बंद होणे, या विषयांबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात एक शब्दही नव्हता, अशी टीका काँग्रेसने शुक्रवारी केली आहे. मोदी सरकारच्या जुन्याच घोषणांची यादी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात होती. त्यात नवे काहीच नव्हते, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात त्याच त्या जुन्या घोषणा होत्या, अशा शब्दात चिदम्बरम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशातील गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर ठप्प होत चाललेल्या विकास प्रकल्पांबाबत सरकारने काहीही बोललेले नाही. अनेक उद्योग बंद होत चालले आहेत, याबद्दलही सरकार शांत आहे, अशी टीका पी. चिदम्बरम यांनी केली आहे.

संपूर्ण भाषणात त्याच त्या जुन्या घोषणा ऐकायला मिळाल्या. त्यातून गेल्या पाच वर्षांत सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते. या भाषणात आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी एक शब्दही उच्चारला गेला नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. नोकऱ्या गेल्या, बेकारी वाढली आणि ग्राहकमूल्यांची वाढती चलनवाढ याबाबतीत या भाषणात काहीही नव्हते. या भाषणात हजारो उद्योग, विशेषत: लघु उद्योग बंद झाल्याबाबत एक शब्दही नव्हता, असेही चिदम्बरम यांनी नमूद केले.

सीएएच्या निषेधार्थ जामिया भागात निदर्शने करणाऱ्यांवर गुरुवारी एकाने गोळीबार केल्यानंतर तेथे तणाव पसरला होता. गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला. गोळीबार केला गेला तेव्हा तेथे मोठा पोलीस बंदोबस्त होता व गोळीबार करून ती व्यक्ती तिच्या डोक्यावर पिस्टल नाचवत व ‘ये लो आझादी’ अशी ओरडत निघून गेली.

उत्तर प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस
उत्तर प्रदेशमध्ये सीएएच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची झालेली हानी भरून काढण्यासाठी कथित निदर्शकांना जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या नोटिसा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करणाºया याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तयारी दाखवली व राज्य सरकारने आपली भूमिका मांडावी, असे सांगितले.
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड व के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितले आहे. या नोटिसा मनमानी पद्धतीने दिल्याचा आरोप याचिकेत परवेझ अरीफ टिटू यांनी केला आहे.

रुग्णालयातून सुटका
जामिया मिलिया विद्यापीठ परिसरात गुरुवारी झालेल्या गोळीबारात जखमी झालेला विद्यार्थी शाहदाब फारुक याला शुक्रवारी ‘एम्स’ रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली गेली.



राष्ट्रपतींच्या भाषणावेळी विरोधकांनी केला निषेध
नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए), एनआरसी आणि एनपीआरच्या निषेधार्थ काँग्रेसह १४ विरोधी पक्षांनी शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण सुरू असताना दंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या.
कोविंद यांचे भाषण सुरू असताना या पक्षांचे नेते पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये एकत्रही बसले होते. या नेत्यांसोबत बसण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते समोरच्या रांगांतील आपापली जागा सोडून आले होते.
सरकारने सीएए अस्तित्वात आणून देशाच्या घटनेवर हल्ला केल्याचा निषेध म्हणून दंडावर काळ्या फिती बांधण्यात आल्या होत्या, असे या नेत्यांनी म्हटले. कोविंद यांनी भाषणात सीएएची प्रशंसा केल्यावर विरोधी नेत्यांनी निषेध केला.
कोविंद यांनी सीएएचा उल्लेख केल्यावर काही विरोधी सदस्यांनी सेंट्रल हॉलमध्ये ‘शेम शेम’ असे ओरडून फलकही झळकवले. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, माकप, भाकप, झारखंड मुक्ती मोर्चा, शिवसेना, जनता दल (एस), केरळ काँग्रेस (एम), इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि नॅशनल काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी दंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले.

सत्ताधा-यांची चिथावणी -प्रियांका
सत्ताधारी पक्षातील मंत्री लोकांना गोळीबार करण्यास चिथावणी देत असतील, तर जामिया मिलिया परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटना शक्य आहेत, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी भाजपला फटकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते हिंसाचारासोबत आहेत की, अहिंसेसोबत याचे उत्तर द्यावे, असे गांधी यांनी हिंदी भाषेत केलेल्या टिष्ट्वटरवर म्हटले.

रखडलेल्या प्रकल्पांचा उल्लेखही नाही
हे सरकार बोगस आहे, अशा शब्दात चिदम्बरम यांनी टीका केली. राष्ट्रपतींचे भाषणही त्याला अनुसरूनच होते. देशात गुंतवणूक कमी आणि रखडलेल्या अनेक विकास प्रकल्पांची वाढती संख्या याबाबत राष्ट्रपतींनी उच्चारही केला नाही. उत्पादन क्षेत्राचे भविष्य अंधारमय आहे, असेही ते म्हणाले.

आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी हटवले
दिल्ली पोलिसांच्या येथील आयटीओतील मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेऊन तेथून काढून दिले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात सीएएविरोधात निदर्शने करणाºयांवर गुरुवारी एकाने गोळीबार केला होता.



पैसे कोणी दिले - राहुल गांधी 
नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचा (सीएए) निषेध करणाºया लोकांवर येथील जामिया मिलिया विद्यापीठ परिसरात गुरुवारी गोळीबार करणाºया व्यक्तीला कोणी पैसे दिले, असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी विचारला.
गोळीबाराच्या घटनेबद्दल वार्ताहरांनी विचारले असता संसदेत प्रवेश करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘गोळीबार करणाºयाला पैसे कोणी दिले?’ गांधी यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर महात्मा गांधी यांचे वचन दिले होते.
‘मी तुम्हाला हिंसाचार शिकवू शकत नाही. कारण माझा त्यावर विश्वास नाही. तुम्हाला जिवाचे मोल द्यावे लागले तरी कोणाही समोर तुम्ही मान वाकवू नका, एवढेच मी तुम्हाला शिकवू शकतो.’

Web Title: Old announcement in President's speech; There is not one word about ending the economic downturn, what about unemployment? Congress criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.