कोरोना रुग्णांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये ४१ % भर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 06:57 AM2020-10-02T06:57:26+5:302020-10-02T06:58:28+5:30

बळींचा आकडा वाढला : बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय

The number of corona patients increased by 41% in September | कोरोना रुग्णांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये ४१ % भर

कोरोना रुग्णांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये ४१ % भर

Next

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. त्यानंतर ते आतापर्यंतच्या कालावधीत एकट्या सप्टेंबर महिन्यात देशभरात कोरोनाचे तब्बल २६ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. हे प्रमाण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४१.५३ टक्के आहे.

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ६३ लाखांवर पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे ३३,३९० जणांचा बळी गेला. हे प्रमाण आतापर्यंत बळी गेलेल्या ९८ हजारांहून अधिक जणांच्या तुलनेत ३३.८४ टक्के आहे. याच महिन्यात २४,३३,३१९ जण कोरोनाच्या आजारातून बरे झाले. हे प्रमाण आतापर्यंत बरे झालेल्या ५२ लाखांहून अधिक लोकांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४६.१५ टक्के आहे. जगभरात कोरोनातून बरे झालेल्यांची सर्वात जास्त संख्या भारतात आहे. त्यानंतर ब्राझिल व मग अमेरिकेचा क्रमांक लागतो असे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.

असा गाठला रुग्णसंख्येने ६० लाखांचा पल्ला
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून रुग्णसंख्येने १ लाखाचा पल्ला गाठण्यासाठी
110
दिवस लागले.

त्यानंतर ५९ दिवसांत रुग्णसंख्या १० लाखांवर गेली. त्या काळात कोरोनाचा फैलाव आणखी वाढू लागला होता. रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाख होण्यास २१ दिवस, २० लाखांवरून ही संख्या ३० लाख होण्यास १६ दिवस लागले.

त्यानंतरच्या १३ दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा ४० लाख झाला. त्यानंतरच्या ११ दिवसांत ५० लाख व त्यापुढील १२ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येने ६० लाखांचा पल्ला गाठला.

Web Title: The number of corona patients increased by 41% in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.