काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेस कोड, पुरुष धोतर, तर महिला नेसणार साडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:15 AM2020-01-13T10:15:26+5:302020-01-13T10:16:25+5:30

उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे.

Now at the Kashi Vishwanath Temple, dress code, male dhoti, and female Wearing a sari | काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेस कोड, पुरुष धोतर, तर महिला नेसणार साडी!

काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेस कोड, पुरुष धोतर, तर महिला नेसणार साडी!

Next

वाराणसीः उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. महाकालच्या मंदिरात बाबा विश्वनाथांना अभिषेक आणि स्पर्श करण्यासाठी भाविकांना धोतर (न शिवलेलं वस्त्र) परिधान करणं अनिवार्य असेल. तर मंदिरात आलेल्या महिला भाविकांनी साडी नेसणं सक्तीचं केलं आहे. महिलांनी साडी नेसलेली असल्यासच त्यांना बाबा विश्वनाथांना अभिषेक आणि स्पर्श करता येईल. मकर संक्रांतीनंतर या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

पँट, शर्ट, जिन्स, सूट परिधान केलेल्या भाविकांना फक्त बाबांचे लांबून दर्शन करता येणार आहे. बाबा विश्वनाथाचं स्पर्शदर्शन भाविकांना मंगला आरतीपासून मध्यान्ह आरतीपर्यंत मिळणार आहे. मकर संक्रांतीनंतर नवी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. रविवारी मंदिर प्रशासन आणि काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काशी विद्वत परिषदेच्या सदस्यांनी स्पर्श दर्शन व्यवस्था आणखी सुस्थितीत आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

तसेच विद्वत परिषदेच्या सदस्यांनी उज्जैनमधील महाकाल ज्योतिर्लिंग, रामेश्वरम आणि सबरीमाला मंदिराचं उदाहरण दिलं आहे. महाकालच्या भस्म आरतीच्या वेळी बाबा स्पर्श करण्यासाठी न शिवलेलं वस्त्र परिधान करतात. इतर भाविक फक्त दर्शन आणि पूजन करतो. श्री काशी विश्वनाथ मंदिरातही ही नवी व्यवस्था लागू केली पाहिजे, असाही विद्वत परिषदेच्या सदस्यांनी सूचना केली आहे. 
 

Web Title: Now at the Kashi Vishwanath Temple, dress code, male dhoti, and female Wearing a sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.