CoronaVirus News : आता फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 05:45 PM2020-05-30T17:45:47+5:302020-05-30T17:54:58+5:30

ज्या रुग्णालयांना हे हॉटेल्स अॅटॅच करण्यात येणार आहेत, त्यात सरिता विहार येथील अपोलो हॉस्पिटल, बत्रा हॉस्पिटल, राजेंद्र प्‍लेस येथील बीएल कपूर हॉस्पिटल, साकेत येथील मॅक्‍स हॉस्पिटल, करोल बाग जवळील सर गंगा राम हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

now corona patients can be treated in five star hotels in delhi sna | CoronaVirus News : आता फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

CoronaVirus News : आता फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

Next
ठळक मुद्देदेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण आणि रुग्णालयांतील बेडची कमतरता लक्षात घेत, दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे.5 जूनपर्यंत दिल्लीत 9500 बेड उपलब्ध असतील.


नवी दिल्‍ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण आणि रुग्णालयांतील बेडची कमतरता लक्षात घेऊन दिल्ली सरकारने खासगी हॉटेल्‍सना रुग्णालयात रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत दिल्‍ली सरकारने खासगी हॉटेल्स टेकओव्हर करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. यामुळे आता दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात बेड नाहीत म्हणून भटकण्याची वेळ येणार नाही. 

हॉटेल्स ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू -
जे हॉटेल टेकओव्हर केले जात आहेत. त्यात दिल्लीतील सूर्या हॉटेल, क्राउन प्‍लाझा, सिद्धार्थ हॉटेल, शेरटन हॉटेल आणि जीवीतेश हॉटेलचा समावेश आहे. ही पाचही हॉटेल्स दिल्‍लीतील पाच मोठ्या रुग्णालयांशी अॅटॅच करण्यात येणार आहेत. दिल्‍ली सरकारने अॅटॅच करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

 दिलासादायक! देशात पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्ण घटले, 24 तसांत तब्बल 11 हजार जण ठणठणीत होऊन घरी परतले

दिल्‍ली सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णालयांना हे हॉटेल्स अॅटॅच करण्यात येणार आहेत, त्यात सरिता विहार येथील अपोलो हॉस्पिटल, बत्रा हॉस्पिटल, राजेंद्र प्‍लेस येथील बीएल कपूर हॉस्पिटल, साकेत येथील मॅक्‍स हॉस्पिटल, करोल बाग जवळील सर गंगा राम हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

मुख्‍यमंत्री म्हणाले, रुग्णालयांत बेटची कमतरता नाही -
दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, रुग्णालयात बेटची कमतरता भासून नये, ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ नये, याची व्यवस्था करण्यात आली आहे. 2100 रुग्ण सध्या रुग्णालयात आहेत. एक आठवड्यापूर्वी 4500 बेड होते. यात आणखी 2100 बेड वाढवण्यात आले आहेत. म्हणजे आता एकूण 6600 बेड उपलब्ध आहेत. 5 जूनपर्यंत दिल्लीत 9500 बेड उपलब्ध असतील. केजरीवाल म्हणाले खासगी रुग्णालयांत 2500हून अधिक बेड आहेत. ते 5 जूनपर्यंत 3600हून अधिक करण्यात येतील. सरकारी रुग्णालयातही सरकारने चांगल्या प्रकारची व्यवस्था केली आहे. तसेच रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार व्हावेत यासाठी हॉटेल्सदेखील टेकओव्हर केली जात आहेत. 

CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

Web Title: now corona patients can be treated in five star hotels in delhi sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.