नुसती बिग बझार डीलच नाही, अंबानींनी हजारोंच्या नोकऱ्या वाचविल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:06 PM2020-08-30T18:06:55+5:302020-08-30T18:09:21+5:30

Big Bazaar deal: फ्यूचर ग्रुपचे विविध ब्रँडचे 1650 हून अधिक स्टोअर्स आहेत. यामध्ये हजारो, लाखो लोक काम करतात. कर्जाच्या खाईत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही संकट आले होते.

Not just the Big Bazaar deal, Mukesh Ambani saved thousands of jobs in Future group | नुसती बिग बझार डीलच नाही, अंबानींनी हजारोंच्या नोकऱ्या वाचविल्या

नुसती बिग बझार डीलच नाही, अंबानींनी हजारोंच्या नोकऱ्या वाचविल्या

Next

नवी दिल्ली : कर्जाच्या खाईत बुडालेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या फ्युचर ग्रुपला मुकेश अंबानी यांनी नवी संजिवनी दिली आहे. शनिवारी रिलायन्सने 24,713 कोटींचा व्यवहार करून फ्यूचर ग्रुपचे अधिग्रहन केले आहे. हा असा ग्रुप होता ज्यामध्ये जवळपास लाखावर लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवत होते. कर्ज चुकते करता न आल्याने कंपनीला टाळे ठोकले जाण्याची शक्यता वाढली होती. 

गलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीत


संपूर्ण देशात बिग बझारचे 295 स्टोअर्स आहेत. यामध्ये हजारो लोक काम करतात. या कर्मचाऱ्यांची नोकरी वाचली आहे. फ्यूचर ग्रुपचे मालक किशोर बियानी यांनी 26 वर्षांचे असताना पँटालून या नावाने पहिले स्टोअर सुरु केले होते. तेव्हा ते रिटेल क्षेत्राचे गॉड फादर बनतील याची कोणीच कल्पना केली नव्हती. तसेच त्यांची कंपनीदेखील मोठ्या कर्जात बुडेल याची देखील कोणी कल्पना केली नव्हती. फ्यूचर ग्रुप कर्जाचे हप्ते फेडू शकत नव्हती. त्यांना फॉरेन बॉन्ड्सवर 100 कोटी रुपयांचे नुसते व्याजच चुकते करायचे होते. ग्रेस पिरिएड संपण्याच्या शेवटच्या दिवशी कंपनीने कसेबसे हे पैसे चुकते केले. 


यानंतर कोरोनाने कंपनीची हालतच खराब केली. लॉकडाऊनमुळे कंपनीला अधिकतर स्टोअर बंद करावे लागले. फ्यूचर ग्रुपचे विविध ब्रँडचे 1650 हून अधिक स्टोअर्स आहेत. यामध्ये हजारो, लाखो लोक काम करतात. कर्जाच्या खाईत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही संकट आले होते. हे कर्मचारीही चिंतेत होते. रिलायन्सने त्यांना नवीन आयुष्य दिले आहे. 

खूशखबर! कोरोना लसीचे काऊंटडाऊन सुरु; 'Covishield' 42 दिवसांत मिळू शकते


ईशा अंबानी यांनी सांगितले की, जरी बिग बझार रिलायन्सचा झाला तरीही ग्राहकांसाठी काहीही बदलणार नाही. बिग बझार त्यांच्यासाठी बिग बझारच राहणार आहे. मात्र, रिलायन्सचा व्यावहारिक दृष्टीकोण त्यामध्ये येणार आहे. त्याचे रिब्रँडिंग केले जाणार नाही. 

रिलायन्सची घोषणा

रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने  फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे.  हा व्यवहार लवकरच पूर्णत्वास येणार असून 24713 कोटी रुपयांना ही डील झाली आहे. यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. हा व्यवहार झाल्यावर फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाईफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येणार आहे. RRFLL  ही RRVLच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे. 

Web Title: Not just the Big Bazaar deal, Mukesh Ambani saved thousands of jobs in Future group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.