‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ नव्हे, नुसते ‘लव्हली!, तजेलदारपणातच त्वचेचे खरे सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 03:28 AM2020-06-27T03:28:04+5:302020-06-27T03:28:26+5:30

तजेलदारपणातच त्वचेचे खरे सौंदर्य आहे, हेच यातून आम्हाला बिंबवायचे आहे.

Not 'Fair and Lovely', just 'Lovely!' | ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ नव्हे, नुसते ‘लव्हली!, तजेलदारपणातच त्वचेचे खरे सौंदर्य

‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ नव्हे, नुसते ‘लव्हली!, तजेलदारपणातच त्वचेचे खरे सौंदर्य

googlenewsNext

मुंबई : गौरवर्णी त्वचा हेच केवळ सौदर्याचे लक्षण नाही. त्वचा कोणत्याही रंगाची असली तरी तिच्या तजेलदारपणातच खरे सौंदर्य असते हा संदेश देण्यासाठी हिदुस्तान युनिलिव्हर या बलाढ्य कंपनीने त्यांच्या ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ या त्यांच्या क्रीमच्या नावातून गोरेपणाचे महात्म्य सांगणारा ‘फेअर’ हा शब्द काढून टाकण्याचे ठरविले आहे. कंपनीचे अध्यक्ष संजीव मेहता म्हणाले की, आमच्या फेसक्रीमच्या ब्रँडची सर्व प्रकारच्या त्वचेचा आदर करण्याशी बांधिलकी आहे. त्वचा प्रसाधनांची उत्पादने सर्वसमावेशक करून विविधरुपी सौंदर्याचे महात्म्य रुजविण्याचे आम्ही ठरविले आहे. गेल्या वर्षीपासूनच आम्ही या उत्पादनांच्या जाहिराती व पॅकेजिंगमध्ये बदल करून याची सुरुवात केली होती. तजेलदारपणातच त्वचेचे खरे सौंदर्य आहे, हेच यातून आम्हाला बिंबवायचे आहे.
>कारण काय?
समाजमनावरील गोरेपणाचे एकूणच गारुड व त्याच्या जोरावर चालणारा त्वचा गोरी करण्याचा दावा करणाऱ्या प्रसाधनांचा अब्जावधी रुपयांचा धंदा हा बरेच दिवस टीकेचा विषय झालेला आहे.
या पार्श्वभूमीवर कृष्णवर्णीय नागरिकांना दिल्या जाणाºया पक्षपाती वागणुकीविरुद्ध अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाने कंपनीस हा निर्णय प्रत्यक्ष कृतीत उतरवायला उद्युक्त केले असावे.

Web Title: Not 'Fair and Lovely', just 'Lovely!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा