नोएडामध्ये बहुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्यातून 4 जणांना काढले बाहेर, अनेक जण दबल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 10:20 PM2020-07-31T22:20:53+5:302020-07-31T22:21:35+5:30

ही इमारत नोएडाच्या सेक्टर 11 मध्ये असलेल्या एफ 62मध्ये कोसळली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

noida building collapse sector 11 police rescue operation | नोएडामध्ये बहुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्यातून 4 जणांना काढले बाहेर, अनेक जण दबल्याची भीती

नोएडामध्ये बहुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्यातून 4 जणांना काढले बाहेर, अनेक जण दबल्याची भीती

Next

दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथे बहुमजली इमारत कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बरेच जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाची बचाव पथके दाखल झाली आहेत. ही इमारत नोएडाच्या सेक्टर 11 मध्ये असलेल्या एफ 62मध्ये कोसळली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि एनडीआरएफची एक पथक घटनास्थळी पोलीस दलासह हजर आहे. या ढिगाऱ्याखाली 10 पेक्षा जास्त लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. वाचविण्यात आलेल्यांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, बरीच माणसे ढिगाऱ्याखाली दबली आहेत. ही इमारत नोएडा सेक्टर 24 पोलीस स्टेशन अंतर्गत येते.
अलीकडच्या काळात हा दुसरा मोठा अपघात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील भानुशाली इमारतीचा एक भाग पडला होता. या अपघातात 10हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी मुंबईच्या मालाडमध्येही दोन मजली घर कोसळल्याची दुर्घटना घडली होती. 

Web Title: noida building collapse sector 11 police rescue operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.