Coronavirus : अद्याप कम्युनिटी ट्रांसमिशन नाही, मृतांचा आकडा 200वर - आरोग्य मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:35 PM2020-04-10T19:35:24+5:302020-04-10T19:57:59+5:30

यावेळी अग्रवाल यांनी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्‍टन अमरिंदर सिंग यांनी राज्यात कम्‍युनिटी ट्रांसमिशनचा केलेला दावाई फेटाळून लावला. तसेच अद्याप कम्यूनिटी ट्रांसमिशन झाले नसले तरीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही अग्रवाल म्हणाले.  

No community transmission yet in the country says Health Ministry sna | Coronavirus : अद्याप कम्युनिटी ट्रांसमिशन नाही, मृतांचा आकडा 200वर - आरोग्य मंत्रालय

Coronavirus : अद्याप कम्युनिटी ट्रांसमिशन नाही, मृतांचा आकडा 200वर - आरोग्य मंत्रालय

Next
ठळक मुद्देदेशभरात 24 तासांत एकूण 896 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेतदेशात आतापर्यंत एकूण 6761 जणांना कोरोनाची लागण झाली आहेकोरोनामुळे देशात आतापर्यंत 206 जणांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्‍ली - देशात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 896 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 6761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 6039 सक्रिय असून 516 जण बरे हेऊन घरी परतले आहेत. तर 206 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट ही, की अद्याप देशात कसल्याही प्रकारचे कम्‍युनिटी ट्रांसमिशन झालेले नाही, अशी माहिती आरोग्यमंत्रालयाचे संयुक्‍त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

यावेळी अग्रवाल यांनी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्‍टन अमरिंदर सिंग यांनी राज्यात कम्‍युनिटी ट्रांसमिशनचा केलेला दावाई फेटाळून लावला. तसेच अद्याप कम्यूनिटी ट्रांसमिशन झाले नसले तरीही आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही अग्रवाल म्हणाले.  

देशात कोरोना व्हायसरची स्थिती, सुरू असलेल्या उपाय योजना आणि लॉकडाऊनच्या स्थितीसंदर्भात आज (शुक्रवारी) आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयाची संयुक्‍त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रार परिषदेत लव अग्रवाल बोलत होते.

अग्रवाल म्हणला गुरुवारी आपण 16,002 टेस्ट केल्या. यापैकी केवळ 0.2 टक्के लोकच पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 146 सरकारी प्रयोगशाळा आणि 67 खासगी प्रयोगशाळांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

औषधाची निर्यात करण्याचा निर्णय -

अग्रवाल म्हणाले, आपल्याला एक कोटी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वाइन गोळ्यांची आवश्यकता आहे. मात्र आपल्याकडे सध्या 3.28 कोटी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वाइन गोळ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे काही प्रमाणावर अधिकच्या गोळ्या पाठवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

परराषट्रमंत्रालयाचे एएस आणि समन्वयक (कोरोना व्हायरस) दम्‍मू रवि यांनी सांगितले, की काल आपण 20,473 परदेशी नागरिकांना बाहेर काढले आहे. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. हे सर्व सरकारी प्रयत्न आहेत. तर गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या, गृह मंत्रालयाने आज सर्व राज्यांना पत्र लिहून लॉकडाऊनची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच कुठल्याही प्रकारची आपत्तिजनक माहिती प्रसारित होणार नाही, यासाठी सोशल मीडियावरही लक्ष ठेवावे, असे सांगितले आहे.
 

Web Title: No community transmission yet in the country says Health Ministry sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.