निजामुद्दीन मरकजचे दिल्ली दंगलीशी कनेक्शन, चौकशीमधून झाला खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 04:35 PM2020-06-04T16:35:35+5:302020-06-04T16:36:34+5:30

निजामुद्दीन मरकजचा दिल्ली दंगलीशी संबंध असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट चौकशीमधून झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Nizamuddin Markaz's connection with Delhi riots | निजामुद्दीन मरकजचे दिल्ली दंगलीशी कनेक्शन, चौकशीमधून झाला खळबळजनक खुलासा

निजामुद्दीन मरकजचे दिल्ली दंगलीशी कनेक्शन, चौकशीमधून झाला खळबळजनक खुलासा

Next

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या सुुरुवातीलाच दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथे शेकडो जमाती वास्तव्यास असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, याच निजामुद्दीन मरकजचा दिल्ली दंगलीशी संबंध असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट चौकशीमधून झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तर पूर्व दिल्लीमधील शिवविहार परिसरातील राजधानी पब्लिक स्कूलमध्ये २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या एसआयटीने बुधवारी चार्जशिट दाखल केली होती. आता सुरू असलेल्या तपासामधून दिल्लीतील दंगलीशी निजामुद्दीन मरकजचा संबंध असल्याचे समोर आले आहे. राजधानी स्कूलचे मालक फैजल फारुख आणि मौलाना सादचा फंड मॅनेजर यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आहेत. तसेच दंगलीच्या वेळीसुद्धा मौलाना सादचे निकटवर्तीय आणि फैजल यांच्यात चर्चा झाली होती.

दंगलीच्या पूर्वी फैजल फारुख यांनी यमुना विहार आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. यामधील एका मालमत्तेची किंमत आठ कोटी तर अन्य एका मालमत्तेची किंमत ११० कोटी रुपये एवढी होती. दरम्यान, मरकजकडील पैसे फैजलच्या माध्यमातून मालमत्तेमध्ये गुंतवण्यात आल्याचा क्राइम ब्रॅंचला संशय आहे.

फैजलकडे तीन पब्लिक स्कूल असून, पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात काल आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील हिंसाचाराचा मास्टर माइंड राजधानी पब्लिक स्कूलचा मालक फैजल फारुख असल्याचा दावा करण्यात येत आहे. दिल्लीत हिंसाचार उसळण्यापूर्वी फैजल फारूख हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अनेक नेते, पिंजरातोड ग्रुप, निजामुद्दीन मरकज, जमिया कोऑर्डिनेशन कमिटी, आमि देवबंदमधील काही धर्मगुरूंच्याही संपर्कात होता. तसेच दिल्लीतील हिंसाचारापूर्वी तो देवबंदमध्येही जाऊन आल्याचे समोर आले आहे.  

राजधानी पब्लिक स्कूलच्या शेजारी असलेल्या डीआरपी स्कूलचे मालक आणि व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजधानी पब्लिक स्कूलच्या छतावर मोठ्या प्रमाणात अॅसिड. विटा, दगड, पेट्रोल आणि बॉम्ब गोळा करण्यात आला होते. तसेच लोखंडापासून बनवलेल्या बेचकीतून ते फेकण्यात येत होते, असा आरोप आरोपपत्रातून करण्यात आला आहे.  

तसेच राजधानी पब्लिक स्कूलच्या छतावरून दोऱ्या टाकून दंगेखोर डीआरपी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये उतरले आणि त्यांनी नासधून व जाळपोळ केली. तसेच शाळेतील कॉम्प्युटर आणि इतर महागडे सामान लुटले, असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या हिंसाचाराप्रकरणी फैजल फारुख याच्यासह १८ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे संपूर्ण षडयंत्र फैजल फारुख यानेच रचल्याचे उघड झाले होते. ज्या दिवशी दंगल झाली त्या दिवशी फैजल याने आपल्या शाळेतील मुलांना लवकर पाठवले होते. तसेच पोलिसांनी या शाळेच्या छतारून बेचकी, स्फोटके आणि अन्य वस्तू जप्त केल्या होत्या.  

Read in English

Web Title: Nizamuddin Markaz's connection with Delhi riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.