“देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचे जगाने कौतुक केले, पण विरोधकांनी केवळ शंका घेतल्या”: सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 08:31 PM2021-11-07T20:31:55+5:302021-11-07T20:32:39+5:30

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामाची यादीच समोर ठेवली.

nirmala sitharaman criticized pm modi working to uplift india image but opposition tarnishing | “देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचे जगाने कौतुक केले, पण विरोधकांनी केवळ शंका घेतल्या”: सीतारामन

“देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचे जगाने कौतुक केले, पण विरोधकांनी केवळ शंका घेतल्या”: सीतारामन

Next

नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामाची यादीच समोर ठेवली. तसेच भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची जगाने नोंद घेतली, त्याचे कौतुकही करण्यात आले. असे असले तरी विरोधकांनी मात्र त्यावर पहिल्यापासून शंकाच घेतली, अशी टीका निर्मला सीतारामन यांनी केली आहे.   

पंतप्रधान मोदी जगात भारताची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असताना विरोधक ती धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. १०० कोटींहून अधिक लसीचे डोस देण्याबद्दल भारताने जो मार्ग अवलंबला, त्याची जगभरात प्रशंसा होत आहे. लसीकरण आणि एकूणच आरोग्यसेवा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे सीतारमन यांनी सांगितले. 

महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हे आमचे ब्रीदवाक्य

संरक्षण क्षेत्रात आणि लष्करात महिलांचा प्रवेश आणि सैनिक शाळांची स्थापना या ठरावाचा एक भाग होता. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हे आमचे ब्रीदवाक्य आहे. तसेच लोकांच्या जीवाची काळजी घेत आम्ही ८० कोटी लोकांना ८ महिने अन्न दिले तसेच ‘वन नेशन, वन रेशन’ जारी करण्यात आले. या योजनेमुळे स्थलांतरित कामगारांना इतर राज्यांमध्ये त्यांच्या कामाच्या ठिकाणी तसेच त्यांची शिधापत्रिका नोंदणीकृत नसलेल्या ठिकाणी रेशन मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. 

डिजिटल इंडियाद्वारे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली

आमच्या भ्रष्टाचारमुक्त सरकारने डिजिटल इंडियाद्वारे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली आहे, असा दावा करत आताच्या घडीला भारत खूप मोठ्या प्रमाणात बदल पाहत आणि अनुभवत आहे. डिजिटल इंडिया मिशन त्यांना गती देत आहे. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया मिशनद्वारे करण्यात आलेल्या मदतीमुळे भारताला अधिक बळकट करेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: nirmala sitharaman criticized pm modi working to uplift india image but opposition tarnishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.