कोरोनामुळे पुन्हा बिघडली परिस्थिती, 'या' दोन राज्यांतील 8 शहरांमध्ये उद्यापासून नाईट कर्फ्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 11:29 PM2020-11-20T23:29:14+5:302020-11-20T23:29:37+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वेगवेगळ्या राज्यांना आता पुन्हा एकदा खबरदारीच्या दृष्टीने पावले उचलणे भाग पडत आहे.

Night curfew in madhya pradesh and gujarat cities due to rising corona virus cases | कोरोनामुळे पुन्हा बिघडली परिस्थिती, 'या' दोन राज्यांतील 8 शहरांमध्ये उद्यापासून नाईट कर्फ्यू!

कोरोनामुळे पुन्हा बिघडली परिस्थिती, 'या' दोन राज्यांतील 8 शहरांमध्ये उद्यापासून नाईट कर्फ्यू!

Next

नवी दिल्ली - कोरोनापुढे जगातील बड्या-बड्या देशांनी गुडघे टेकेले आहेत. याला भारतही अपवाद नाही. कोरोनामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांना आता पुन्हा एकदा खबरदारीच्या दृष्टीने पावले उचलणे भाग पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही शहरांत उद्या रात्रीपासून नाईट कर्फ्यू लावला जाणार आहे.

एएनआय या वृत्त संस्थेने उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांचा हवाला देत म्हटले आहे, की गुजरातच्या राजकोट, सूरत आणि वडोदरामध्ये, उद्यापासून आवश्यक आणि आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या लोकांशिवाय कुणालाही रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत बाहेर येण्याची परवानगी नसेल.

मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, विदिशा आणि रतलाममध्येही उद्यापासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. मात्र, या काळात आवश्यक सेवा पुरविणाऱ्या तसेच फॅक्ट्री वर्कर्सना सूट दिली जाईल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

राजस्थानात कलम 144 -  
राजस्थान सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 21 नोव्हेंबरपासून कलम 144 लगू करण्याचा सल्ला दिला आहे. राजस्थानात आता कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. येथे थंडीबरोबरच आता कोरोना रुग्ण संख्येतही वाढ होऊ लागली आहे. राज्यात 19 नोव्हेंबरला पहिल्यांदाच एका दिवसात अडीच हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. यामुळे आता राजस्थान सरकारनेही कोरोना संक्रमणाचा सामना करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. 

Web Title: Night curfew in madhya pradesh and gujarat cities due to rising corona virus cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.