कोरोनाचा नवा व्हेरिअंट अधिक 'चलाख', आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:44 PM2021-06-15T18:44:08+5:302021-06-15T18:45:38+5:30

देशातील कोरोना प्रादुर्भावाची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली.

new variant of corona is smarter it is necessary to follow social distancing and be careful dr vk paul | कोरोनाचा नवा व्हेरिअंट अधिक 'चलाख', आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा

कोरोनाचा नवा व्हेरिअंट अधिक 'चलाख', आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा

googlenewsNext

देशातील कोरोना प्रादुर्भावाची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. देशात सध्या जवळपास ९ लाख सक्रिय रुग्ण असून २० राज्यांमध्ये सध्या ५ हजाराहून कमी सक्रिय रुग्ण आहेत, असं अग्रवाल यांनी सांगितलं. यासोबत कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाख १७ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीमध्ये जवळपास ८५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ ते १० वर्षांच्या मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण ३.२८ टक्के इतकं होतं. तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण  ३.०५ टक्के इतकं आढळून आलं आहे. याशिवाय ११ ते २० वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण ८.०३ टक्के इतकं होतं. तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ८.०५ इतकं आहे. 

देशात सध्या एकूण २६ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा डोस देण्यात आला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे मोठं अस्त्र असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं. देशातील प्रत्येक नागरिकानं मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या कोरोना संबंधिच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करतो, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. यासोबत लांबचा प्रवास टाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला आहे. 

नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटबाबत नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. "कोरोना विषाणूचा नवा व्हेरिअंट २०२० सालच्या व्हेरिअंटपेक्षा खूप चलाख झाला आहे. त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सिंगचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. मास्कचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे. नाहीतर परिस्थिती पुन्हा एकदा बिघडू शकते", असा इशारा व्ही.के.पॉल यांनी दिला आहे.

Web Title: new variant of corona is smarter it is necessary to follow social distancing and be careful dr vk paul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.