New Patnaik for fifth time, 10 new faces in the cabinet | नवीन पटनायक पाचव्यांदा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळात १० नवीन चेहरे
नवीन पटनायक पाचव्यांदा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळात १० नवीन चेहरे

भुवनेश्वर : ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदी सलग पाचव्यांदा विराजमान होण्याचा विक्रम करणारे नवीन पटनायक यांचा व त्यांच्या २० मंत्र्यांच्या शपथविधी बुधवारी पार पडला. या मंत्रिमंडळात १० नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, त्यात दोन महिला मंत्र्यांचाही समावेश आहे. ओडिशा विधानसभेचे १४७ सदस्य निवडण्यासाठी झालेल्या निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने (बिजद) ११२ जागा जिंकल्या. नवीन पटनायक व त्यांच्या मंत्र्यांना राज्यपाल गणेशी लाल यांनी शपथ दिली. शपथविधीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांचे अभिनंदन केले आहे. नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळामध्ये ११ कॅबिनेट मंत्री आहेत. त्यात अनुसूचित जमातीचे चार व अनुसूचित जातीचे दोघे आहेत. ओडिशातील ३० पैकी १३ जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.


Web Title: New Patnaik for fifth time, 10 new faces in the cabinet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.