आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा

By मोरेश्वर येरम | Published: January 2, 2021 02:58 PM2021-01-02T14:58:44+5:302021-01-02T15:00:08+5:30

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगितलं.

new delhi city farmers protest reached 38th day at singhu border | आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा

आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा

Next

नवी दिल्ली
नव्या कृषी कायद्यांवरुन सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता आणखी तीव्र करण्याची तयारी आंदोलन शेतकऱ्यांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या सिंघू सीमेवर 'ट्रॅक्टर परेड' काढणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलं आहे. आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी माहिती दिली. 

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. येत्या ६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च आयोजित करण्यात येणार आहे. तर १५ जानेवारी रोजी भाजपच्या नेत्यांना घेराव घालणार असल्याची रणनिती शेतकऱ्यांनी आखली आहे. २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून राज्यपाल भवनापर्यंत मोर्चा काढण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलं आहे. त्यानंतर २६ जानेवारी रोजी दिल्लीत सर्व शेतकरी ट्रॅक्टर परेड करतील, असं शेतकरी आंदोलकांनी जाहीर केलं आहे. 

संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला बीएस राजेवाल, दर्शन पाल, गुरूनाम सिंह, जगजीत सिंह, शिव कुमार शर्मा कक्का आणि योगेंद्र यादव उपस्थित होते. ४ जानेवारी रोजी जर सरकारने आमची मागणी मान्य केली नाही, तर आंदोलन तीव्र केलं जाईल, असं यावेळी सांगण्यात आलं. 
 

Web Title: new delhi city farmers protest reached 38th day at singhu border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.