दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज-पर्रीकर
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
नवी दिल्ली : पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ले कायमचे थांबविण्यासाठी किवा ते कमी करण्यासाठी चोख प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज-पर्रीकर
नवी दिल्ली : पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ले कायमचे थांबविण्यासाठी किवा ते कमी करण्यासाठी चोख प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. सरकार एक पद, एक पेन्शन धोरण लागू करण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. येत्या चार ते आठ आठवड्यात याबाबत घोषणा करण्यात यईल, असे पर्रीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, संरक्षण साहित्य खरेदीसाठी प्रतिनिधी असण्याच्या संदर्भातील जानेवारीत स्पष्ट धोरण मांडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.