नक्षलींचा जवानावर हल्ला: वॉकी-टॉकी, फोन पळवला; दंतेवाडा जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:02 AM2020-06-28T00:02:44+5:302020-06-28T00:02:59+5:30

किरांदूल व बचेली भागातील खाण परिसरात दोन जवान गस्त घालत असताना हा प्रकार घडला.

Naxals attack jawans: walkie-talkies, phone hijacked; Incidents in Dantewada district | नक्षलींचा जवानावर हल्ला: वॉकी-टॉकी, फोन पळवला; दंतेवाडा जिल्ह्यातील घटना

नक्षलींचा जवानावर हल्ला: वॉकी-टॉकी, फोन पळवला; दंतेवाडा जिल्ह्यातील घटना

Next

रायपूर : नक्षलवाद्यांनी दगडाच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात सीआयएसएफ जवान जखमी झाला असून, त्याच्याकडील वॉकी-टॉकी, मोबाईल फोन पळवला आहे. छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली.

किरांदूल व बचेली भागातील खाण परिसरात दोन जवान गस्त घालत असताना हा प्रकार घडला. सामान्य नागरिकांच्या पोशाखात आलेल्या नक्षलींजवळ धनुष्यबाण होते. त्यांनी जवानांना त्यांची वॉकी-टॉकी व फोन देण्यास सांगितले. जवानांनी नकार देताच जवानांच्या डोक्यात दगड मारले व वॉकी-टॉकी, मोबाईल फोन घेऊन पळ काढला. जवानांची आणखी कुमक घटनास्थळी येईपर्यंत नक्षली जंगलात पळून गेले. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Naxals attack jawans: walkie-talkies, phone hijacked; Incidents in Dantewada district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.