Navy Day: शत्रूंना धडकी भरवणारे नौदल; भारताच्या सामर्थ्याची जगात असते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 02:54 AM2020-12-04T02:54:29+5:302020-12-04T07:58:49+5:30

शत्रूच्या उरात धडकी भरेल असे सामर्थ्य नौदलाला लाभले आहे. या सामर्थ्याविषयी...

Navy Day: Navy scaring off enemies; India's power is discussed in the world | Navy Day: शत्रूंना धडकी भरवणारे नौदल; भारताच्या सामर्थ्याची जगात असते चर्चा

Navy Day: शत्रूंना धडकी भरवणारे नौदल; भारताच्या सामर्थ्याची जगात असते चर्चा

googlenewsNext

जगातले सातव्या क्रमांकाचे आरमार, असा नावलौकिक असलेल्या भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर रोजी, १९७१च्या युद्धातील पराक्रमाची आठवण म्हणून ‘नौदल दिन’ साजरा केला जातो. हिंदी महासागर, पश्चिमेचा अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा उपसागर या तीनही महासागरांवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या भारतीय नौदलाला मोठा इतिहास आहे. शत्रूच्या उरात धडकी भरेल असे सामर्थ्य नौदलाला लाभले आहे. या सामर्थ्याविषयी...

‘नौदल दिन’ ४ डिसेंबरलाच का? 

  • ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला चढवला
  • पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ‘ऑपरेशन ट्रायडंट’ ही मोहीम आखण्यात आली
  • पाकिस्तानी नौदलाचे मुख्यालय असलेल्या कराचीला लक्ष्य करण्यात आले
  • ४ डिसेंबर रोजी कराची बंदरापासून ६० किमी अंतरावर भारतीय नौदलाने पाकिस्तानी जहाजांवर हल्ला केला
  • त्यात पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले
  • या विजयी दिवसाची आठवण म्हणून ४ डिसेंबरला नौदल दिन’ साजरा केला जातो
  • ध्रुव, केए-२८, केए-३१, सी किंग एमके ४२सी, यूएच-३ सी किंग, चेतक आणि एमच-६० सी हॉक

 

१५० जहाजे आणि पाणबुड्या

१ विमानवाहू युद्धनौका

२३ पारंपरिक ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या

२ बॅलिस्टिक मिसाइल पाणबुड्या

३०० लढाऊ  विमाने

१३ फ्रिगेट्स

१० विनाशिका

१ अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी

६७,२५२ सक्रिय कर्मचारी

१०,००० अधिकारी    ५७,२४० खलाशी

५५,००० राखीव फौज

 

Web Title: Navy Day: Navy scaring off enemies; India's power is discussed in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.