नौदलाची जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी, बंगालच्या उपसागरात अचूक साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:28 AM2020-10-31T04:28:42+5:302020-10-31T04:29:11+5:30

INS kora : नौदलाच्या क्षेपणास्त्र पथदर्शित ‘आयएनएस कोरा’ या लढाऊ जहाजावरून डागलेल्या जहाजभेदी क्षेपणास्त्राने नेमका निशाणा साधून लक्ष्यित जहाज खाक केले, अशी माहिती नौदलाने ट्वीट करून दिली.

Naval anti-ship missile test, accurate target in the Bay of Bengal | नौदलाची जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी, बंगालच्या उपसागरात अचूक साधला निशाणा

नौदलाची जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी, बंगालच्या उपसागरात अचूक साधला निशाणा

Next

नवी दिल्ली :  भारतीय नौदलाने  शुक्रवारी आयएनएस कोरा या लढाऊ जहाजावरून जहाजभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या सागरी युद्धाभ्यासातून भारताभोवतालच्या सामरिक सागरी क्षेत्रातील युद्ध सज्जता प्रतीत होते. बंगालच्या उपसागरात डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने  अचूक  निशाणा साधत लक्ष्यभेद केला.

नौदलाच्या क्षेपणास्त्र पथदर्शित ‘आयएनएस कोरा’ या लढाऊ जहाजावरून डागलेल्या जहाजभेदी क्षेपणास्त्राने नेमका निशाणा साधून लक्ष्यित जहाज खाक केले, अशी माहिती नौदलाने ट्वीट करून दिली.

अरबी सागरात बुडत्या जहाजावर या क्षेपणास्त्राने   अचूक निशाणा साधत  बुडते जहाज नष्ट केल्याचा व्हिडिओ नौदलाने  मागच्या आवठड्यात जारी केला होता. हे क्षेपणास्त्र विमानवाहक आयएनएस विक्रमादित्य आणि अनेक लढाऊ जहाजे, लढाऊ विमान, हेलिकॉप्टर आणि नौदलाच्या अन्य उपकरणांसह करण्यात आलेल्या नौदलाच्या सरावादरम्यान आयएनएस प्रबलवरून डागण्यात आले होते.

Web Title: Naval anti-ship missile test, accurate target in the Bay of Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.