"ममता बॅनर्जी 'नाटकी', नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने त्या करतात राजकारण"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:18 AM2022-01-25T08:18:27+5:302022-01-25T08:19:57+5:30

Mamata Banerjee And BJP Soumitra Khan : ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.

"Nautanki Mamata Banerjee Doing Politics Over Netaji": Bengal BJP Leader Soumitra Khan | "ममता बॅनर्जी 'नाटकी', नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने त्या करतात राजकारण"

"ममता बॅनर्जी 'नाटकी', नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने त्या करतात राजकारण"

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष सौमित्र खान (BJP Soumitra Khan) यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांना 'नाटकी' आहेत असं म्हणत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावर राजकारण करत असल्याची टीका केली आहे. तसेच "नाटकी ममता बॅनर्जी प्रत्येक गोष्टीत नाटक करतात. सिंगूरच्या तरुणांसोबतही त्यांनी असेच केले. काल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शंख फुकून त्यांनी नाटक केलं" असं देखील सौमित्र खान यांनी म्हटलं आहे. 

"26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी बंगालचा देखावा समाविष्ट केला जाणार नाही. कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका तृणमूलच्या सदस्यानेच केली असावी. नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांचा पुतळा बसवल्यानंतर, मोदींचे कार्य किती महान आहे, हे तुमच्या लक्षात येईल" असंही खान यांनी म्हटलं आहे. यासोबतच "पूर्वी ममता बॅनर्जी स्वतः केंद्रीय मंत्री होत्या, त्यांनी त्या वेळी इतर केंद्रीय मंत्र्यांमध्ये नेताजींचा विषय लोकसभेत का उपस्थित केला नाही?" असा सवाल देखील भाजपाच्या सौमित्र खान यांनी उपस्थित केला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

यूपीच्या विधानसभा निवडणुकीत आता समाजवादी पक्षाला तृणमूल काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला आहे. टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत यूपीमध्ये मते मागताना दिसतील. 8 फेब्रुवारीला ममता बॅनर्जी राजधानी लखनौमध्ये सपासाठी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमाने संबोधित करतील. याशिया, ममता पीएम मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही ऑनलाईन प्रचार करतील.

आता उत्तर प्रदेशच्या निवडणूक रणात उतरणार ममता; भाजपचं टेन्शन वाढणार

यापूर्वी, TMC आणि सपा एकत्रितपणे सार्वजनिक रॅली करतील आशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु कोविड-19 साथीच्या आजारामुळे निवडणूक आयोगाने लादलेल्या निर्बंधांमुळे ही योजना रद्द करण्यात आली. खरे तर, निवडणूक आयोगाने रोड शो आणि रॅली यांसारख्या राजकीय हालचालींवर 22 जानेवारीपर्यंत बंदी वाढवली आहे. आयोग 22 जानेवारी रोजी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेईल, तोपर्यंत राजकीय पक्षांना डिजिटल प्रचार करावा लागेल.
 

Web Title: "Nautanki Mamata Banerjee Doing Politics Over Netaji": Bengal BJP Leader Soumitra Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.