Nagrota Encounter : मसूद अझरचा भाऊ दहशतवाद्यांना सूचना देत होता, पुराव्यांवरून धक्कादायक खुलासा

By ravalnath.patil | Published: November 21, 2020 10:58 AM2020-11-21T10:58:25+5:302020-11-21T11:04:09+5:30

Nagrota Encounter : चकमकीत ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानहून पाठविण्यात आले होते व तेथून त्यांना सूचनाही देण्यात आल्या असल्याचा आता पुरावा आता तपास यंत्रणांना मिळाला आहे.

nagrota encounter masood azhar brother giving instructions to 4 jaish terrorists killed in nagrota | Nagrota Encounter : मसूद अझरचा भाऊ दहशतवाद्यांना सूचना देत होता, पुराव्यांवरून धक्कादायक खुलासा

Nagrota Encounter : मसूद अझरचा भाऊ दहशतवाद्यांना सूचना देत होता, पुराव्यांवरून धक्कादायक खुलासा

Next
ठळक मुद्देचकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून 11 एके 47 रायफल्स, 29 हँड ग्रेनेड आणि तीन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत.

नगरोटा : जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे दहशतवादी पाकिस्तानचे होते. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकीवेळी मोठा हल्ला करण्याच्या उद्देशाने पाठविण्यात आले होते. तसेच, हे दहशतवादी पाकिस्तानमधील जैशचा प्रमुख मसूद अझरचा भाऊ रऊफ लाला याच्यासोबत सतत संपर्क साधत होते. ज्यावेळी या दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला, त्यावेळी रऊफ लाला या सर्व दहशतवाद्यांना सूचना देत होता, असे तपास यंत्रणांनी सांगितले.

चकमकीत ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानहून पाठविण्यात आले होते व तेथून त्यांना सूचनाही देण्यात आल्या असल्याचा आता पुरावा आता तपास यंत्रणांना मिळाला आहे. दहशतवाद्यांकडून पाकिस्तानच्या एका कंपनीचा डिजिटल मोबाइल रेडिओ (डीएमआर) तपास यंत्रणेला सापडला आहे. इतकेच नाही तर दहशतवाद्यांकडे सापडलेल्या मोबाइलवरील मेसेजेस पाहिल्यानंतर हेही स्पष्ट झाले की, दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या मार्गदर्शकांच्या सतत संपर्कात होते. हे संदेश पाकिस्तानच्या शकरगडहून पाठविण्यात आल्याची तपास यंत्रणेला शंका आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, डिजिटल मोबाइल रेडिओ पाकिस्तानस्थित मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स कंपनी तयार करते. दहशतवाद्यांच्या मोबाइलवरील मेसेज पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले की, पाकिस्तान पुन्हा एकदा भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा विचार करीत होता. यासह तपास यंत्रणांना सापडलेल्या दहशतवाद्यांचे शूज पाकिस्तानच्या कराचीमध्ये तयार करण्यात आले आहेत. यासह वायरलेस सेट व एक जीपीएस डिव्हाइसही जप्त करण्यात आला आहे, ज्यांच्या तपासणीत ही सर्व उपकरणे पाकिस्तानातून घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी शक्करगडमध्ये दिसला होता रऊफ लाला     
सुत्रांच्या माहितीनुसार, रऊफ लाला काही दिवसांपूर्वी जम्मूमधील सांबा येथे आणि पाकिस्तानच्या शक्करगडमधील हिरानगर सेक्टरमध्ये दिसला होता. 31 जानेवारीला सुद्धा रऊफ लाला याने अशाचप्रकारे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा कट रचला होता, परंतु सुरक्षा दलाने या दहशतवाद्यांना बन टोल प्लाझाजवळ घेरले आणि त्यांचा खात्मा केला होता.

दहशतवाद्यांकडून 11 एके 47 रायफल जप्त
चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून 11 एके 47 रायफल्स, 29 हँड ग्रेनेड आणि तीन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. याखेरीज आणखी काही वस्तूही सापडल्या आहेत.

Web Title: nagrota encounter masood azhar brother giving instructions to 4 jaish terrorists killed in nagrota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.