'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:36 AM2020-05-26T10:36:14+5:302020-05-26T10:39:46+5:30

लॉकडाऊन संपल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे मंदिर बांधणार असून त्यामध्ये मोदींची मोठी मुर्ती असेल अशी घोषणा केली आहे. 

mussoorie bjp mla build temple with pm idol after releasing modi aarti SSS | 'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा

'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा

Next

नवी दिल्ली - उत्तराखंड सरकारमधील एका मंत्र्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणारी आरती लॉन्च केली आहे. सध्या ही आरती सोशल मीडियावरील लोकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. उत्तरखंडमधील भाजपाचे आमदार गणेश जोशी यांनी रविवारी 'श्री मोदी जी की आरती'चे लॉन्च केली. तसेच यानंतर त्यांनी मोदींचे मोठे मंदिर बांधण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे मंदिर बांधणार असून त्यामध्ये मोदींची मोठी मुर्ती असेल अशी घोषणा केली आहे. 

'माझ्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल प्रचंड आदर आहे. ते केवळ राष्ट्रीय नेते नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत. त्यांचे नेतृत्व पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही आश्चर्य वाटले. त्यांची आरती प्रकाशित करुन मी काहीही चूक केलेली नाही. हा लॉकडाऊन संपल्यानंतर मी मोदींची मुर्ती असणारे एक मंदिर उभारणार आहे' असं जोशी यांनी म्हटलं आहेत. तसेच मंदिर उभारणे हे काही चुकीचे नाही. अनेक लोकांनी  सोनिया गांधी आणि रजनीकांत यांचं मंदिर बांधलं आहे कारण लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते त्यांचा सन्मान करतात असं देखील जोशी म्हणाले. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

'माझ्या घरातील देवघरामध्ये देवांच्या बाजूला मी त्यांचा फोटो ठेवला आहे. एक सामान्य कार्यकर्ता होतो तेव्हापासून मी त्यांचा फोटो माझ्या कार्यालयामध्ये ठेवला आहे. मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे' असं गणेश जोशी यांनी सांगितलं. मोदींच्या आरतीवर उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गरिमा दसौनी यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे. गरिमा म्हणाले की, उत्तराखंड राज्यमंत्री धनसिंग रावत आणि गणेश जोशी यांच्या या कृत्याने संपूर्ण हिंदू सनातन धर्माचा अपमान केला आहे. मोदी एक माणूस आहेत आणि त्यांना देवी-देवतांच्या श्रेणीत स्थान दिले जाऊ शकत नाही. 

“जो मोदी जी की आरती गावे, भारत देश परमपद पावे”; भाजपा मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लॉन्च

मोदींची स्तुती करताना आरतीमध्ये वापरलेले शब्द त्यांचे देव म्हणून वर्णन करतात असा आरोप त्यांनी केला. तसेच जे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करीत होते ते आज एका व्यक्तीपुरते मर्यादित झाले आहेत आणि त्यांच्या पादुका पूजेसाठी कोणत्याही पातळीवर येऊ शकतात. गरिमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्याकडे या प्रकाराची दखल घेत या दोघांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्याचसोबत या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस भवनात निदर्शने केली. महिला कॉंग्रेसने नेहरू कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 100 वॅटचा बल्ब लावला म्हणून घरमालकाने केली भाडेकरूची हत्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

Web Title: mussoorie bjp mla build temple with pm idol after releasing modi aarti SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.