Video: कामावर न आल्यानं मालकानं तरुणाला चाबकानं फोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 10:01 AM2018-07-06T10:01:23+5:302018-07-06T10:03:22+5:30

मालकाकडून अमानुष मारहाणीचं चित्रीकरण

mp dalit youth beaten by owner with whip for not coming on work | Video: कामावर न आल्यानं मालकानं तरुणाला चाबकानं फोडलं

Video: कामावर न आल्यानं मालकानं तरुणाला चाबकानं फोडलं

होशंगाबाद: कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सुट्टी घेतली म्हणून पेट्रोल पंप चालकानं कर्मचाऱ्याला चाबकानं मारहाण केल्याची घटना मध्यप्रदेशातील होशंगाबादमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पेट्रोल पंप चालकानं या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ तयार केला आहे. होशंगाबादच्या रायपूरचा रहिवासी असलेला अजय अहिरवार शिवनंदी पेट्रोल पंपवर काम करायचा. काही दिवसांपूर्वी अजयचा अपघात झाल्यानं तो कामावर येऊ शकला नाही. त्यामुळे संतापलेल्या पेट्रोल पंप चालकानं त्याला पेट्रोल भरायच्या मशिनला बांधून मारहाण केली. 

रायपूरला राहणाऱ्या अजयचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. त्यामुळे 5 ते 6 दिवस त्याला कामावर येता आलं नाही. अजय कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर राहिल्यानं पेट्रोल पंप चालक भडकला. चालकानं त्याच्या एका साथीदाराला अजयच्या घरी पाठवलं. त्यानंतर अजयला पेट्रोल पंपवर आणण्यात आलं आणि त्याला पेट्रोल भरण्याच्या मशीनला बांधलं. अजयला चाबकानं बेदम मारहाण करण्यात आली. जवळपास 10 मिनिटं अजयला निर्दयीपणे चाबकानं फोडून काढण्यात आलं. या अमानुष मारहाणीचं चित्रणदेखील पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आलं. यानंतर अजयनं कशीबशी स्वत:ची सुटका केली आणि घाबरुन स्वत:च्या गावी निघून गेला.





अजयला मारहाण करणाऱ्यांची नावं दीपक साहू आणि चिंटू साहू असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ मिळताच पोलिसांनी दीपक आणि चिंटूला अटक केली. या दोघांनी ज्या चाबकानं अजयला मारहाण केली, तो चाबूक पोलिसांनी जप्त केला आहे. 

Web Title: mp dalit youth beaten by owner with whip for not coming on work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.