बापरे! पतीकडून पत्नीला मारहाण योग्यच; ३० टक्क्यांहून अधिक महिलांनी दिलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 09:13 PM2021-11-28T21:13:56+5:302021-11-28T21:14:25+5:30

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे.

More Than 30 Percent Of Women Justify Beating Husbands Nfhs | बापरे! पतीकडून पत्नीला मारहाण योग्यच; ३० टक्क्यांहून अधिक महिलांनी दिलं समर्थन

बापरे! पतीकडून पत्नीला मारहाण योग्यच; ३० टक्क्यांहून अधिक महिलांनी दिलं समर्थन

Next

नवी दिल्ली – महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देशभरात ठिकठिकाणी आवाज उठवले जातात. महिलांवर अत्याचार चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जातं. परंतु राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून जो रिपोर्ट समोर आलाय त्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. यामागचं कारणही तसेच आहे. देशातील १८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात १४ ते ३० टक्क्याहून अधिक महिलांनी नवऱ्याकडून होणाऱ्या मारहाणीचं समर्थन केले आहे. तर खूप कमी टक्के पुरुषांनी मारहाणीच्या कृत्याचं समर्थन केले आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर मणिपूर ६६ टक्के, केरळ ५२ टक्के, जम्मू काश्मीर ४९ टक्के, महाराष्ट्र ४४ टक्के, पश्चिम बंगाल ४२ टक्के यानुसार अनेक राज्यात महिलांनी पुरुषांकडून त्यांच्या बायकोला होणारी मारहाण योग्य ठरवली आहे.

नवऱ्याकडून मारहाणीचं काय आहे कारण?

सर्वेक्षणात त्या संभाव्य परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात एक पती त्याच्या पत्नीला मारहाण करतो. जर ती विश्वासघातकी असल्याचा संशय असेल. जर सासरच्या माणसांचा सातत्याने अपमान करत असेल. त्यांच्याशी वाद घालत असेल. जर ती लैंगिक संबंध बनवण्यास नकार देत असेल. नवऱ्याला न सांगता बाहेर जात असेल. जेवणं बनवत नसेल. घराची आणि लहान मुलांची काळजी घेत नसेल.

मारहाण योग्य ठरवण्यामागचं कारण काय?

नवऱ्याकडून बायकोला मारहाण योग्य असल्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घराची, मुलांची काळजी न घेणे. सासरच्या मंडळींचा आदर न करणे हे आहे. १८ राज्यातील १३ राज्यात हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि पश्चिम बंगालमध्ये महिलांनी नवऱ्याकडून सासरच्या मंडळींचा आदर न करणे त्यामुळे मारहाण झाली असेल तर योग्य असल्याचं म्हटलं आहे.

कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ

नवऱ्याद्वारे मारहाण योग्य असल्याचं ठरवणाऱ्या महिलांमध्ये सर्वात कमी संख्या हिमाचल प्रदेशची आहे. पुरुषांमध्ये कर्नाटक ८१.९ टक्के नवऱ्याने केलेली मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. हैदराबाद येथील एका संस्थेने कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं म्हटलं आहे.  

Web Title: More Than 30 Percent Of Women Justify Beating Husbands Nfhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.