Coronavirus: "कोरोनाला रोखण्यासाठी जे करता येईल ते करा", मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला फ्री हँड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:46 PM2021-05-18T13:46:42+5:302021-05-18T13:59:21+5:30

Coronavirus in India: देशात कोरोना विषाणूच्या साथीचे थैमान सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ४६ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

Modi gave a mantra to the District Collector to stop Corona, saying, "In the fight against Corona, you ..." | Coronavirus: "कोरोनाला रोखण्यासाठी जे करता येईल ते करा", मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला फ्री हँड

Coronavirus: "कोरोनाला रोखण्यासाठी जे करता येईल ते करा", मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला फ्री हँड

Next

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या साथीचे थैमान सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ४६ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.  (Coronavirus in India)आज दुपारी १२ वाजता आयोजित झालेल्या या बैठकीला कर्नाटक, बिहार, आसाम, चंदिगड, तामिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीमधील जिल्हाधिकारी उपस्थित होते. (PM Narendra Modi's Meeting with District Collectors" 

या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना टेस्टिंग, कंटेन्मेंट आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच हे प्रशासकीय अधिकारी म्हणजे कोरोनाविरोधातील लढाईमधील कमांडर असल्याचे सांगितले. यावेळी मोदी म्हणाले, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जे करा येईत ते करा. जी पावले उचलता येतील ती उचला. त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला संपूर्ण सूट आहे. आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत. तेवढीच वेगवेगळी आव्हाने आहेत. एकप्रकारे प्रत्येक जिल्ह्याची वेगळी असी आव्हाने आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आव्हाने चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. त्यामुळे जेव्हा तुमचा जिल्हा जिंकतो. तेव्हा तुमचा देशही जिंकतो. तेव्हा तुमचा जिल्हा हरतो, तेव्हा तुमचा देशही हरतो हे लक्षात ठेवा.  

 दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील संसर्गामुळे तज्ज्ञ चिंतीत आहेत. त्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये सध्या ग्रामीण आणि दुर्गम भागांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आवश्यक सेवांबाबत पंतप्रधान म्हणाले की, कोविडशिवाय तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या ईज ऑफ लिव्हिंगवरही लक्ष ठेवावे लागेल. 

या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात लढण्याची हत्यारे आणि टेस्टिंग, ट्रॅकिंग फॉर्म्युल्याचा विशेष उल्लेख केला. मोदींनी सांगितले की, या विषाणूविरोधात लढण्यासाठी आपल्याकडे लोकल कंटेन्मेंट झोन, वेगाने तपासणी आणि लोकांपर्यंत योग्य आणि संपूर्ण माहिती पोहोचवणे. टेस्टिंग ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि कोरोनाकाळातील नियमांचे पालन करणे ही हत्यारे आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईत तुमची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही एकप्रकारे या लढाईमधील फिल्ड कमांडर आहात. 

Web Title: Modi gave a mantra to the District Collector to stop Corona, saying, "In the fight against Corona, you ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.