कोरोना विरुद्धच्या लढाईत आता पाककृती कामी येणार? सरकारकडून २६ रेसिपींची माहिती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 04:46 PM2021-10-15T16:46:27+5:302021-10-15T16:46:39+5:30

यामुळंच कोरोनादरम्यान आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि निसर्गोपचारांअंतर्गत आयुष मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वं समोर येत आहेत. त्याचबरोबर, आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आयुषद्वारे विशेष रेसिपी असणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

Ministry of Ayush launches recipes booklet to fight corona and improve immune sysytem | कोरोना विरुद्धच्या लढाईत आता पाककृती कामी येणार? सरकारकडून २६ रेसिपींची माहिती जाहीर

कोरोना विरुद्धच्या लढाईत आता पाककृती कामी येणार? सरकारकडून २६ रेसिपींची माहिती जाहीर

googlenewsNext

कोरोनामुळं रोगांशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) चांगली असणं खूप महत्त्वाचं असल्याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. यामुळंच कोरोनादरम्यान आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि निसर्गोपचारांअंतर्गत आयुष मंत्रालयाकडून (Ministry of Ayush) मार्गदर्शक तत्त्वं समोर येत आहेत. त्याचबरोबर, आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आयुषद्वारे विशेष रेसिपी असणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

आयुष मंत्रालयानं हा उपक्रम अलीकडेच सुरू केला आहे. या पाककृती बनवण्याची पद्धत देखील या पुस्तिकेत सांगितली आहे, जेणेकरून लोक या पाककृती त्यांच्या घरी बनवू शकतील. या पाककृतींचा आहारात समावेश केल्यानं रोगप्रतिकारशक्ती चांगली होईल आणि रोगांना प्रतिबंध होईल, असं मंत्रालयानं म्हटलंय. आयुर्वेदाच्या निकषांनुसार फळं, भाज्या किंवा मसाले पारंपरिक खाद्यपदार्थांच्या पाककृतींमध्ये वापरले गेले आहेत.

आयुषनं एकूण २६ प्रकारच्या फूड रेसिपीज लॉन्च केल्या आहेत. यामध्ये अमलकी पनाका, आवळा स्क्वॅश, गुलकंद, बीटरूट हलवा, बेसन-रवा पॅनकेक, तीळ चटणी, रागी आणि केळी स्‍मूदी, पेया, आलेपाक, मधुका लेहा, रसाला, युषा, खलम, कुळीथ, रसम, टाकरा, नायजर सीड्स लाडू, आप्पम यांचा समावेश आहे. पाककृतींमध्ये खजूर लाडू, भोपळा आणि बिग बीन्स स्वीट पॅनकेक, गुसबेरी स्टिर फ्राय, मम्सा रसम, लाजरड्राका आदींचा समावेश आहे.

लोकांना या पदार्थांच्या पारंपारिक खाद्यपदार्थांची माहिती मिळावी, म्हणून या पाककृती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असं आयुषतर्फे सांगण्यात आलंय. याचा वापर केल्यामुळं रोग बरे होण्यास तसंच रोग होण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंध करण्यास उपयुक्त घटक शरीराला मिळण्यास मदत होईल, असं आयुष मंत्रालयानं म्हटलंय. या पाककृतींची एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सर्व राज्य सरकारांना अशा प्रकारच्या पारंपरिक पाककृतींना प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आलंय.

कोविड महामारी पसरल्यापासून आयुषतर्फे सतत लोकांना ‘आयुष फूड’ खाण्यासाठी आवाहन केलं जातंय. यात अनेक प्रकारच्या पारंपारिक खाद्यपदार्थांचा समावेश आहे. मात्र, लोकांनी कोणताही पदार्थ, मसाला किंवा कोणताही पदार्थ आयुर्वेदिक औषध मानून वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरू नये, असा स्पष्ट इशारा देखील आयुषकडून देण्यात आला आहे. कारण, त्याचे काही तोटेही असू शकतात.

Web Title: Ministry of Ayush launches recipes booklet to fight corona and improve immune sysytem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.