Petrol Diesel Price: 'पेट्रोल २०० रुपये लीटर झालं तर ट्रिपल सीट प्रवास करा', भाजपा नेत्यानं जखमेवर मीठ चोळलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:15 PM2021-10-20T15:15:15+5:302021-10-20T15:19:24+5:30

कोरोना विरोधाच्या संकटाला देश सामोरं जात असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनंही सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे.

From Ministers To State Chief Bjp Leaders Rubbing Salt On Wounds Of Petrol Diesel Price Hike | Petrol Diesel Price: 'पेट्रोल २०० रुपये लीटर झालं तर ट्रिपल सीट प्रवास करा', भाजपा नेत्यानं जखमेवर मीठ चोळलं!

Petrol Diesel Price: 'पेट्रोल २०० रुपये लीटर झालं तर ट्रिपल सीट प्रवास करा', भाजपा नेत्यानं जखमेवर मीठ चोळलं!

Next

नवी दिल्ली-

कोरोना विरोधाच्या संकटाला देश सामोरं जात असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनंही सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. यातच सत्ताधारी भाजपा सरकारमधील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महागाईनं ग्रासलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जात असल्याचं दिसून येत आहे. कोरोना विरोधातील लढाईत खूप खर्च येत असल्यानं त्याची भरपाई तेलाच्या वाढत्या दरातून केली जात असल्याचं वक्तव्य असो किंवा मग सर्वांना मोफत लसीचा खर्च सरकार करतंय म्हणूनच पेट्रोल-डिझेलवरील कर वाढविण्यात आल्याचं विधान असो. त्यात आता आणखी एका विधानाची भर पडली आहे. देशात पेट्रोल २०० रुपयी प्रतिलीटर झालं तर मोटारसायकवरुन ट्रिपल सीट प्रवास करावा असा अजब सल्ला भाजपा नेत्यानं केलं आहे. 

आसाम भाजपाचे प्रमुख भावेत कालिता यांनी पेट्रोल २०० रुपये प्रतिलीटर झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेनं काय करावं याचं उत्तर दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकार दुचाकीवर दोन ऐवजी तीन लोकांना प्रवासाला परवानगी देईल असं म्हटलं आहे. आलिशान कार न वापरता लोकांनी दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करावा असं अजब तर्कट भाजप नेते भावेत कालिता यांनी मांडलं आहे. काँग्रेसनं कालिता यांच्या विधानाला कडाडून विरोध केला आहे. 

Read in English

Web Title: From Ministers To State Chief Bjp Leaders Rubbing Salt On Wounds Of Petrol Diesel Price Hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.