अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:24 IST2025-12-02T11:23:41+5:302025-12-02T11:24:25+5:30
उत्तर प्रदेशातील मेरठमधून बेपत्ता झालेला नवरदेव हरिद्वारमध्ये सापडला आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील मेरठमधून बेपत्ता झालेला नवरदेव हरिद्वारमध्ये सापडला आहे. नवरदेवाने सांगितलं की, तो मानसिक तणावामुळे घराबाहेर पडला होता. पळून गेला होता. काळजी करण्यासारखं दुसरं काहीही नाही. सध्या तरी तो घरी सुरक्षित परत आल्यामुळे कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे.
मोहसीनचं लग्न गेल्या आठवड्यात मुझफ्फरनगरमधील खतौली येथे झालं. लग्नानंतर हनिमूनच्या रात्री खोलीत जास्त प्रकाश असल्याची तक्रार करणाऱ्या नववधूने मोहसीनला एक लहान बल्ब आणण्यास सांगितलं. मोहसीन बल्ब आणण्याच्या बहाण्याने खोलीतून बाहेर पडला आणि परत घरी आलाच नाही.
वधू आणि कुटुंबीयांनी रात्रभर त्याची वाट पाहिली. मोहसीन बेपत्ता झाल्यामुळे घरात गोंधळ उडाला. दुसऱ्याच दिवशी मोहसीनच्या बहिणींचं लग्न होतं. ते देखील त्याच्याशिवाय पार पडलं. तो शेवटचा गंगा कालव्याच्या काठाजवळ सीसीटीव्हीमध्ये दिसला होता.
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
मोहसीन बेपत्ता झाल्यानंतर पीएसी गोताखोरांना बोलावण्यात आलं आणि कालव्यात शोध घेण्यात आला, परंतु तो सापडला नाही. सोमवारी मोहसीनने त्याच्या कुटुंबाला फोन करून तो हरिद्वारमध्ये असल्याचं सांगितलं. माहिती मिळताच कुटुंबाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलीस पथक त्यानंतर कुटुंबासह हरिद्वारला पोहोचलं आणि मोहसीनला सुखरूपपणे शोधून काढलं. पोलीस चौकशीदरम्यान मोहसीनने पोलिसांना सांगितलं की, लग्नानंतर हनिमूनच्या रात्री तो त्याच्या पत्नीसमोर घाबरला होता आणि या मानसिक ताणामुळे घराबाहेर पडला होता. तो परत आल्यानंतर आता सर्वजण आनंदी आहेत.