महाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या बाळाच्या जन्मावेळी मातेची शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:59 AM2020-09-14T00:59:47+5:302020-09-14T06:15:01+5:30

बाळांच्या जन्मावेळी लोकांना आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक खर्च करावा लागतो.

Maternal surgery for every third child born in Maharashtra | महाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या बाळाच्या जन्मावेळी मातेची शस्त्रक्रिया

महाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या बाळाच्या जन्मावेळी मातेची शस्त्रक्रिया

Next


- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : महाराष्टÑात प्रत्येक तिस-या बालकाच्या जन्माच्या वेळी शस्त्रक्रिया होत आहे. यातील ७८.६ टक्के खाजगी रुग्णालयांत व उर्वरित २२.४ टक्के सरकारी रुग्णालयांतील आहेत. शहरी भागात सुमारे ४० टक्के, तर ग्रामीण भागात २५ टक्के बाळांचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे होतो आहे.
राष्टÑीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) ताज्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयांत ८०.८ टक्के व शहरांतील ७१.५ टक्के बाळांचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे झाला.

खाजगी रुग्णालयांचा खर्च ९ पट जास्त
बाळंतपणावेळी होणाºया शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयांनी सरकारी रुग्णालयांच्या ९ पट जास्त पैसे वसूल केले. सरकारी रुग्णालयात सिझेरियनसाठी सरासरी ५,५४३ रुपये खर्च आला, तर खाजगी रुग्णालयांनी यासाठी सरासरी ४६,८१९ रुपये वसूल केले.

खिशातून जास्त खर्च : बाळांच्या जन्मावेळी लोकांना आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक खर्च करावा लागतो.

महाराष्टÑात तुलनेत चांगली स्थिती
69%
तेलंगणा
46%
केरळ
43%
पंजाब
50%
आंध्र
44%
तामिळनाडू
महाराष्टÑात शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या बाळांचा जन्म होण्याचे प्रमाण राष्टÑीय सरासरीपेक्षा अधिक असले तरी अनेक प्रमुख राज्यांपेक्षा स्थिती चांगली आहे. तथापि, बिहारमध्ये याचे प्रमाण १५ व उत्तर प्रदेशात २३ टक्के होते.

खाजगी रुग्णालयांत जास्त बिले : सरकारी रुग्णालयांत बाळांच्या जन्मावर ग्रामीण भागात सरासरी २,४०४ रुपये व शहरी भागांत ३,१०६ रुपये खर्च आला.
ग्रामीण भागातग्रामीण भागात
"20,788
खाजगी रुग्णालयांत प्रत्येकासाठी खर्च
"29,406
खाजगी रुग्णालयांत सिझेरियनला खर्च

शहरी भागातील खर्च
"29,105
खाजगी रुग्णालयांत प्रत्येकासाठी खर्च
"37,508
खाजगी रुग्णालयांत सिझेरियनला खर्च

खिशातून जास्त खर्च : बाळांच्या जन्मावेळी लोकांना आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक खर्च करावा लागतो.
ग्रामीण भागातील खर्च
"17,413
खाजगी रुग्णालयांत सरासरी
"1,356
सरकारी रुग्णालयांत सरासरी

शहरी भागातील खर्च
"25,059
खाजगी रुग्णालयांत सरासरी
"2,520
सरकारी रुग्णालयांत सरासरी

 

Web Title: Maternal surgery for every third child born in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.