मनमोहन सिंग राजस्थानातूनच राज्यसभेवर जाण्याची शक्यता, सैनी यांच्या निधनाने जागा झाली रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 05:35 AM2019-06-30T05:35:58+5:302019-06-30T05:53:32+5:30

माजी पंतप्रधानांना अन्य कोणत्याही राज्यातून राज्यसभेवर पाठवता येईल, इतके संख्याबळ काँग्रेसकडे नाही; मात्र भाजपचे राजस्थानातील राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांचे तीनच दिवसांपूर्वी निधन झाले.

Manmohan Singh may get Rajya Sabha from Rajasthan | मनमोहन सिंग राजस्थानातूनच राज्यसभेवर जाण्याची शक्यता, सैनी यांच्या निधनाने जागा झाली रिक्त

मनमोहन सिंग राजस्थानातूनच राज्यसभेवर जाण्याची शक्यता, सैनी यांच्या निधनाने जागा झाली रिक्त

googlenewsNext

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठवण्याचा विचार काँग्रेस करीत आहे. त्यांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव द्रमुकने फेटाळला होता. त्यामुळे डॉ. सिंग यांची संसदीय कारकीर्द संपणार की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
माजी पंतप्रधानांना अन्य कोणत्याही राज्यातून राज्यसभेवर पाठवता येईल, इतके संख्याबळ काँग्रेसकडे नाही; मात्र भाजपचे राजस्थानातील राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांचे तीनच दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तेथील जागा रिक्त झाली आहे. शिवाय राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ अधिक आहे. मदनलाल सैनी हे राजस्थान भाजपचे अध्यक्षही होते.

काँग्रेसचे १00 आमदार
- राजस्थानात काँग्रेसचे १00 आमदार असून, १३ अपक्ष आमदार हे काँग्रेसचे सहसदस्य आहेत. याशिवाय माकपचे दोन व बसपचे सहा आमदार असून, त्यांची मते भाजपने उमेदवार उभा केला तरी त्याला मिळणार नाहीत. अशा स्थितीत तेथूनच डॉ. सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
- डॉ. सिंग हे २८ वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. ते आधी आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत १४ जून रोजी संपली. आता आसाममध्ये भाजपचे सरकार असल्याने तेथून डॉ. सिंग यांना निवडून आणणे काँग्रेसला शक्य नव्हते.

Web Title: Manmohan Singh may get Rajya Sabha from Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.