दिवाळीआधी दहशतवाद्यांची मोठी घुसखोरी रोखली; कॅप्टनसह तीन जवान शहीद

By हेमंत बावकर | Published: November 8, 2020 02:54 PM2020-11-08T14:54:07+5:302020-11-08T14:59:24+5:30

Encounter in Jammu Kashmir: शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले.

major infiltration of terrorists before Diwali; Three soldiers martyrs in Encounter | दिवाळीआधी दहशतवाद्यांची मोठी घुसखोरी रोखली; कॅप्टनसह तीन जवान शहीद

दिवाळीआधी दहशतवाद्यांची मोठी घुसखोरी रोखली; कॅप्टनसह तीन जवान शहीद

Next

जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान  शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत. 




शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये भारतीय जवान प्राणांची बाजी लावत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे जवान आहेत. संयुक्त मोहिम सुरु असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


शनिवारी रात्रीपासून माछिल सेक्टरमध्ये गस्ती पथकाला संशयस्पद हालचाली दिसल्या. यावेळी दहशतवादी मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्न करत होते. या वेळी दहशतवाद्यांवर सैन्याने गोळीबार केला. यात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून एक एके 47 रायफल आणि 2 बॅग ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 

Web Title: major infiltration of terrorists before Diwali; Three soldiers martyrs in Encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.