Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:56 AM2019-09-18T03:56:01+5:302019-09-18T03:56:18+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या दोन-तीन दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - First list of Congress for vidhan sabha election soon? | Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच?

Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच?

Next

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या दोन-तीन दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. संभाव्य पडझड रोखण्यासाठी पहिली यादी त्वरित जाहीर करून नेत्यांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी तयारी पक्षाने केल्याचे सूत्रांनी सांगितले.
छाननी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी दिल्लीत होत आहे. यावेळी समिती सदस्यांसह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व प्रभारी मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस १२५-१२५ जागा लढणार असल्याचे सूत्र निश्चित झाले तरी कोणते मतदारसंघ कुणी घ्यायचे, यावरून वाद आहेत. गेल्या निवडणुकांत काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ जण निवडून आले होते.
यापैकी जवळपास १० आमदार भाजप व शिवसेनेत दाखल झालेले आहेत. या मतदारसंघांत दोन्ही पक्षांना दुसरे उमेदवार द्यावे लागणार
आहेत.
छाननी समितीत पहिल्या यादीवर चर्चा होणार आहे. उमेदवारांची नावे त्वरित जाहीर करून संभाव्य पडझड होऊ नये, याची काळजी घेतली जाणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या ४२ सदस्यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही आमदारांनी भाजप-सेनेचा गड जवळ केला आहे. यात आणखी जाण्याची शक्यता असल्याने ही पडझड थांबविण्यासाठी पहिली यादी तरी त्वरित जाहीर करावी, अशी आमदारांनीच मागणी केल्याचे समजते.
>सोनिया गांधी करणार शिक्कामोर्तब
छाननी समितीही या यादीवर शिक्कामोर्तब करून अ. भा. काँग्रेस समितीकडे पाठविणार आहे. उमेदवारांच्या अंतिम यादीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची संमती मिळाल्यानंतर अधिकृतपणे जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - First list of Congress for vidhan sabha election soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.