Maharashtra Election, Maharashtra Government: Narendra Modi's hinting at the establishment of state? Sharad Pawar also increased suspensions | Maharashtra Government: राज्यातील सत्तास्थापनेबाबत नरेंद्र मोदींचे संकेत?; पवारांनीही वाढविला सस्पेन्स
Maharashtra Government: राज्यातील सत्तास्थापनेबाबत नरेंद्र मोदींचे संकेत?; पवारांनीही वाढविला सस्पेन्स

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र सगळ्यांचे लक्ष महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर आहे. दिल्लीत आज सोनिया गांधी, शरद पवार यांची भेट होणार आहे परंतु त्यापूर्वी घडलेल्या घडामोडीमुळे राज्यातील शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाला सुरुंग तर लागणार नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सरकार बनविण्याच्या हालचाली सुरु आहे. किमान समान कार्यक्रम या धर्तीवर हे तीन पक्ष सरकार बनवतील. त्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठकही झाली आहे. पण या सर्व हालचालींना ग्रीन सिग्नल देण्याचं काम काँग्रेस-राष्ट्रवादीचे हायकमांड अर्थात सोनिया गांधी आणि शरद पवार देणार आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी सांगितलं होतं की, आमचं सरकार येईल अन् ते ५ वर्ष टिकेल मात्र आज पवारांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा पेच निर्माण झाला आहे. 

अधिवेशनापूर्वी पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत.“काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं. मोदी म्हणाले की, उत्तम संसदीय व्यवहारासाठी आज मी दोन पक्षांचा विशेष कौतुकाने उल्लेख करेन. ते पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजून जनता दल. हे दोन्ही पक्ष संसदीय मर्यांदांचे अतिशय काटेकोरपणे पालन करतात. त्यांचे सदस्य कधीही सभागृहातील वेलमध्ये उतरून गोंधळ घातल नाहीत. तसेच ते आपले प्रश्न अगदी समर्पकपणे उपस्थित करतात. इतर पक्षांनी त्यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे. 

दरम्यान, शरद पवारांनी सत्तास्थापनेवर केलेलं विधान आणि राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे केलेले कौतुक हे सर्व महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यादृष्टीने महत्वाची आहे. त्यामुळे राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सत्तेत बसणार की, शिवसेनेलासोबत घेऊन राष्ट्रवादी राज्य करणार हे  काही दिवसांत स्पष्ट होईल. 

महत्वाच्या बातम्या

 पवारांची गुगली अन् मोदींनी केलं कौतुक; नवनीत राणांची 'ही' मागणी पूर्ण होणार?

आशिष शेलार मांत्रिकांच्या संपर्कात?; पुरावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने फोटो केला ट्विट, हा बघा!

'कभी कभी लगता है अपुन ही भगवान है', संजय राऊतांचा भाजपवर प्रहार

आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा; विरोधी विचारांच्या जीवावर अभद्र करणार नाही पण...

आमचं ठरलं ! पण ठरलं काय ? हे गुपीत ठेवल्याने झाली भाजपची अडचण


 

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Narendra Modi's hinting at the establishment of state? Sharad Pawar also increased suspensions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.