महंत नरेंद्र गिरींची 'ही' शेवटची इच्छा, महाराजांनी उत्तराधिकारीही सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 01:43 PM2021-09-22T13:43:38+5:302021-09-22T13:44:06+5:30

नरेंद्र गिरींचा मृत्यू झालेल्या घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे

Mahant Narendra Giri's tells his last wish, said the successor and ashram | महंत नरेंद्र गिरींची 'ही' शेवटची इच्छा, महाराजांनी उत्तराधिकारीही सांगितला

महंत नरेंद्र गिरींची 'ही' शेवटची इच्छा, महाराजांनी उत्तराधिकारीही सांगितला

Next
ठळक मुद्दे नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटवरून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचं समोर येत आहे. तसेच त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं.

प्रयागराज - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. खांबावर लटकलेला अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला सील केला. याप्रकरणी तपास सुरू असून पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून आनंद गिरींमुळे आपण तणावात असल्याचं म्हटलं आहे. तसेच, आपली शेवटची इच्छाही त्यांनी यात नमूद केली आहे. 

नरेंद्र गिरींचा मृत्यू झालेल्या घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे. नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटवरून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचं समोर येत आहे. तसेच त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं. नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी "एका मुलीसोबत त्यांचा फोटो मॉर्फ्ड करून" त्यांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आता समोर आली आहे. 

महंतांची शेवटची इच्छा

महंत गिरी यांनी आपल्या मृत्यूपत्रात बलबीर गिरी यांना आपल्या गादीवर बसविण्याचे सांगितले आहे. त्यासोबत, आपली शेवटची इच्छाही व्यक्त केली आहे. पार्कमध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाखाली माझी समाधी लावण्यात यावी, याची जबाबदारीही त्यांनी बलबीर गिरी यांच्यावर सोपवली आहे. बलबीर गिरी हे मंहत नरेंद्र गिरींचे 15 वर्षांपूर्वीपासूनचे शिष्य आहेत. सध्या ते हरिद्वार आश्रमाचे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. आता, त्यांनाच आपला उत्तराधिकारी करा, असे महंत यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  

सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे

महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. "आपल्या मृत्यूसाठी आनंद गिरी, अद्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी हे जबाबदार आहेत. मी प्रयागराजच्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की, माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या या लोकांवर कारवाई करा. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मला कळलं की आनंद गिरी हे माझा एका मुलीसोबतचा मॉर्फ्ड फोटो व्हायरल करणार होते. आनंदने मला सांगितलं की एकदा हे पसरलं की, तुम्ही किती लोकांसमोर तुमचं निर्दोषत्व सिद्ध कराल?’ मी आतापर्यंत माझं आयुष्य सन्मानाने जगलो आहे आणि भविष्यात मी ज्या अपमानाला सामोरे जाईन त्यानंतर त्या आरोपांसह मी जगू शकत नाही" असं नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

"काही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले"

नरेंद्र गिरी यांनी 13 सप्टेंबर रोजी आत्महत्या करणार होतो पण हिंमतच झाली नाही असं म्हणत आपल्या सुसाईड नोटच्या प्रत्येक पानावर खाली आपलं नाव आणि सही देखील केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपासून हनुमान मंदिरात मिळणाऱ्या देणग्यांवरुन महंत आणि या दोघांमध्ये वाद सुरू होता. महंत गिरी यांच्या मृत्यूची बातमी कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु त्यांना मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. महंतांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट आढळली. त्यासोबत सल्फासच्या गोळ्या सापडल्या. सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, अद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा यांच्याविरोधात छळ केल्याचा आरोप आहे. संपूर्ण आयुष्यात कधीही अंगाला काळा डाग लागू दिला नाही. पण काही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले त्यामुळे महंत नरेंद्र गिरी खूप दु:खी होते.
 

Web Title: Mahant Narendra Giri's tells his last wish, said the successor and ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.