काँग्रेस आमदाराने केले CAA चे समर्थन; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 02:35 PM2020-01-12T14:35:24+5:302020-01-12T14:38:17+5:30

काँग्रेस पक्षातील नेत्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली असून, देशभरात त्यांच्याकडून आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे.

madhya pradesh congress mla support caa | काँग्रेस आमदाराने केले CAA चे समर्थन; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

काँग्रेस आमदाराने केले CAA चे समर्थन; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

Next

मध्यप्रदेश : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) मोदी सरकारने रद्द करावा तसेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरची (एनपीआर) प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून होत असतानाचं दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील मध्यप्रदेशमधील आमदाराने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थन केले आहे. तर या कायद्याची अमलबजावणी करण्याची मागणी सुद्धा या आमदाराने केली आहे.

काँग्रेस पक्षातील नेत्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली असून, देशभरात त्यांच्याकडून आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे. मात्र मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील सुवासरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरदीपसिंग डंग यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठींब्यानंतर भाजप नेते व माजी मुख्यंमत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करुन सीएए समजून घेतल्याबद्दल हरदीपसिंग डंग यांचे आभार मानले.

नागरिकत्व कायद्याची अमलबजावणी झाली तर त्यात चुकीचे काय? असा प्रश्न डंग यांनी उपस्थित केला असून, सीएए आणि एनआरसी दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे डंग म्हणाले आहे. जर आमचे बांधव पाकिस्तानात अडचणीत असतील तर त्यांना या कायद्यामुळे भारतात सुविधा मिळू शकेल, त्यास हरकत नसल्याचे सुद्धा ते म्हणाले.

पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाण्याची डंग यांची ही पहिलीच वेळ नसून, या आधी सुद्धा त्यांनी भाजपच्या निर्णयावरून अशीच काही भूमिका मांडली होती. मोदी सरकारच्या काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे सुद्धा डंग यांनी समर्थन केले होते.

 

 

Web Title: madhya pradesh congress mla support caa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.