'मॅडम, तुमच्या भावाला गांजाच्या तस्करीत पकडलंय?' पत्रकारांच्या प्रश्नाने भाजपाच्या महिला मंत्री संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:47 IST2025-12-09T11:47:07+5:302025-12-09T11:47:58+5:30
Madhya Pradesh News: भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमधील नगरविकास आणि आवास राज्यमंत्री प्रतिमा बागरी यांचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पोलिसांनी प्रतिमा बागरी यांच्या भाओजींना गांजाच्या तस्करी प्रकरणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. तर आता बागरी यांचा भाऊ अनिल बागरी यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

'मॅडम, तुमच्या भावाला गांजाच्या तस्करीत पकडलंय?' पत्रकारांच्या प्रश्नाने भाजपाच्या महिला मंत्री संतापल्या
भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमधील नगरविकास आणि आवास राज्यमंत्री प्रतिमा बागरी यांचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पोलिसांनी प्रतिमा बागरी यांच्या भाओजींना गांजाच्या तस्करी प्रकरणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. तर आता बागरी यांचा भाऊ अनिल बागरी यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रतिमा बागरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्या पत्रकारांवर भडकल्या.
रामपूल बघेलान पोलीस ठाण्यातील पोलिसांनी बेकायदेशीर गांजा तस्करी प्रकरणी एक मोठी कारवाी केली होती. गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गांजा जप्त केला होता. तसेच दोन तस्करांना अटक केली होती.
जप्त करण्यात आलेल्या गांजाचे प्रमाण सुमारे ४६ किलोग्रॅम असल्याचे सांगण्यात येत आहे. या अटकेच्या कारवाईमधील धक्कादायक बाब म्हणजे पकडण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी हा मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री असलेल्या प्रतिमा बागरी यांचा सख्खा भाऊ अनिल बागरी हा आहे. या प्रकरणी पत्रकारांनी जेव्हा मंत्री प्रतिमा बागरी यांना प्रश्न विचारला तेव्हा त्या संतापल्या. तसेच तुम्ही लोक जबरदस्तीने हा प्रश्न का विचारताय?, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
तस्करी के आरोप में गिरफ्तार भाई का प्रश्न पूछने पर मीडिया पर झल्लाती "मंत्री साहिबा" का गुस्सा देखिए!
— MP Congress (@INCMP) December 8, 2025
मध्य प्रदेश सरकार के मंत्रियों के रिश्तेदार अब खुलेआम तस्करी में पकड़ा रहे हैं! राज्य मंत्री प्रतिमा बागरी के सगे भाई अनिल बागरी को पुलिस ने गांजा तस्करी में गिरफ्तार किया। इससे… pic.twitter.com/jjJhsjuwvJ
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. तस्करीच्या आरोपाखाली भावाला झालेल्या अटकेबाबत प्रश्न विचारल्याने मंत्रिमहोदयांना आलेला राग पाहा. भाजपाच्या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक कशा प्रकारची काळी कामे करत आहेत. हे या अटकेमधून दिसून आले आहे, असा टोला मध्य प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावरून लगावला आहे.