ना डॉक्टर, ना रजिस्ट्रेशन, OT मध्ये आढळली बिअरची बॉटल..! लखनौमध्ये छापेमारीत 29 रुग्णालयांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:58 AM2021-07-20T11:58:23+5:302021-07-20T12:02:03+5:30

काही रुग्णालयांत तपास पथकाला डॉक्टर सापडले नाही, तर काही रुग्णालयांच्या ऑपरेशन थेटरमध्ये (ओटी) औषधांएवजी बिअरची बॉटल सापडली. अधिकांश रुग्णालये तर विदाऊट रजिस्ट्रेशनचीच सुरू होती. मोठ्या प्रमाणावर नियमांकडे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा यांसाठी 29 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

UP Lucknow hospitals cmo raid no doctor no registration beer bottle in OT | ना डॉक्टर, ना रजिस्ट्रेशन, OT मध्ये आढळली बिअरची बॉटल..! लखनौमध्ये छापेमारीत 29 रुग्णालयांची पोलखोल

ना डॉक्टर, ना रजिस्ट्रेशन, OT मध्ये आढळली बिअरची बॉटल..! लखनौमध्ये छापेमारीत 29 रुग्णालयांची पोलखोल

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे सुरू असलेल्या खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर मनमानी आणि नियमांकडे दुर्लक्ष करत रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. लखनौ जिल्हा प्रशासनाने एकाच वेळी 45 खासगी रुग्णालयांवर छापेमारी केली आहे. यात उपचाराच्या नावावर लोकांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे, हे समोर आले आहे. 

काही रुग्णालयांत तपास पथकाला डॉक्टर सापडले नाही, तर काही रुग्णालयांच्या ऑपरेशन थेटरमध्ये (ओटी) औषधांएवजी बिअरची बॉटल सापडली. अधिकांश रुग्णालये तर विदाऊट रजिस्ट्रेशनचीच सुरू होती. मोठ्या प्रमाणावर नियमांकडे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा यांसाठी 29 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

आरोग्य विभाग आणि लखनौ जिल्हा प्रशासनाच्या 6 चमूंनी  सोमवारी छापेमारी केली. तर काही रुग्णालयांकडे लायसन्स नव्हते, काहींचे लायसन्स एक्सपायर्ड होते, काही रुग्णालयांत डॉक्टर्स नव्हते. तर एका रुग्णालयात चक्क बीएससी पास रुग्णांवर उपचार करत होता. सर्व रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे.

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 30,093 नवे रुग्ण; 125 दिवसांतील नीचांक

या रुग्णालयाच्या ओटीत सापडली बिअरची बाटली -
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी तुलसी अँड ट्रामा रुग्णालयावर छापेमारी केली. यात ट्रामा सेंटरमध्ये चार आयसीयू बेड होते. मात्र, डॉक्टर नव्हते. येथे ओटीच्या फ्रिजमध्ये बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. लायसन्सची वैधताही संपलेली होती. तसेच मेडिप्लस अँड ट्रॉमा सेंटरच्या लाइसन्सची वैधताही संपलेली होती.

छापेमारीदरम्यान मॉडर्न हॉस्पिटल मॅटरनिटी अँड ट्रामा सेंटरमध्ये तीन आयसीयू बेड आढळले. मात्र, एक्स-रे आणि इमरजन्सीची व्यवस्था नव्हती. येथे डॉक्टरही आढळले नाही. स्टॉफ नर्सकडे नर्सिंगची डिग्रीही नव्हती. या प्रकारे न्यू एशियन हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटरमध्ये डॉक्टर नव्हते आणि बीएससी डिग्रीधारक रुग्णालय मालक प्रेम कुमार वर्मा स्वतःच रुग्णांवर उपचार करत होते.

अजबच...! एप्रिलमध्ये ज्याचा कोरोनानं मृत्यू झाला, त्यालाच जुलैमध्ये मिळाला लसीचा दुसरा डोस; असं आहे प्रकरण

छापेमारीनंतर जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश यांच्या आदेशाने सीएमओ डॉ. मनोज अग्रवाल यांनी 29 रुग्णालयांविरुद्ध नोटिस जारी किली आहे. तसेच, रुग्णालय प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास सीलिंगची कारवाई करण्यात येईल, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

Web Title: UP Lucknow hospitals cmo raid no doctor no registration beer bottle in OT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.