हृदयद्रावक! मुख्यमंत्र्यांनी दीड कोटी दिले; पण डोनर नाही मिळाला; कोरोनामुळे डॉक्टरने जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 03:30 PM2021-09-07T15:30:07+5:302021-09-07T15:52:04+5:30

Doctor sharda of lohia institute lost the battle of life after 140 days : शारदा सुमन यांना एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात कार्यरत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांचे फुफ्फुस निकामी झाले होते.

lucknow doctor sharda of lohia institute lost the battle of life after 140 days | हृदयद्रावक! मुख्यमंत्र्यांनी दीड कोटी दिले; पण डोनर नाही मिळाला; कोरोनामुळे डॉक्टरने जीव गमावला

हृदयद्रावक! मुख्यमंत्र्यांनी दीड कोटी दिले; पण डोनर नाही मिळाला; कोरोनामुळे डॉक्टरने जीव गमावला

Next

नवी दिल्ली - कोरोनाच्या महाभयंकर संकटात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरालाच आता आपला जीव गमवावा लागला आहे. जवळपास 140 दिवस व्हेंटिलेटरवर राहून डॉक्टरनेमृत्यूशी लढा दिला पण त्यांची ही झुंज अखेर अपयशी ठरली आहे. शारदा सुमन असं या डॉक्टरचं नाव असून उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी दीड कोटी दिले पण डोनर मिळाला नाही. यामुळेच फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली नाही आणि 4 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. शारदा सुमन यांना एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात कार्यरत असताना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांचे फुफ्फुस निकामी झाले होते.

डॉ. शारदा यांची फुफ्फुसं निकामी झाल्याने त्यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, डोनर न मिळाल्याने ते होऊ शकलं नाही. शारदा यांच्यावर हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात असून त्यांना लहान मुलगी आहे. डॉ. शारदा सुमन या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. दुसऱ्या लाटेत करोनाचा संसर्ग वाढत असताना त्या गर्भवती असूनही कर्तव्य बजावत होत्या. याच दरम्यान एप्रिल महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. 14 एप्रिल रोजी त्यांना लखनऊच्या राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. 

जीव वाचवण्यासाठी फुफ्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकता

शारदा यांच्यावर उपचार सुरू होते मात्र तरीही प्रकृती खालावत गेली आणि हळूहळू त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी होऊ लागली. व्हेंटिलेटरवर असतानाच डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करून त्यांची प्रसुती केली. त्यानंतर डॉ. शारदा सुमन यांचा जीव वाचवण्यासाठी फुफ्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे असं मत काही मोठ्या डॉक्टरांनी दिलं. यासाठी जवळपास दी़ड कोटींचा खर्च असल्याचं देखील सांगण्यात आलं. खर्च खूपच जास्त असल्याने डॉ. शारदा यांचे पती डॉ. अजय यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आर्थिक मदत मागितली. 

डॉ. शारदा सुमन यांना पुढील उपचारासाठी एअरलिफ्ट केलं

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या फुफ्फुस प्रत्यारोपणाला मंजुरी देण्यात आली. डॉ. शारदा सुमन यांना पुढील उपचारासाठी हैदराबादच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले. हैदराबादमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि संसर्ग वाढतच राहिला. यादरम्यान फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी डोनर शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यात यश आले नाही. हैदराबादमध्ये 34 दिवस डॉ. शारदांवर उपचार करण्यात आले पण याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: lucknow doctor sharda of lohia institute lost the battle of life after 140 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.